SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोयनेचे वीजनिर्मितीनंतरचे पाणी मुंबईला नेण्यास हरकत नाही; मात्र वारणेचे पाणी देणार नाही : हसन मुश्रीफलक्ष्मी वकिलांच्या झोळीत, शेतकरी-बहिणी मात्र वाऱ्यावर? सतेज पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!समता, नामस्मरण आणि सेवेचा प्रकाश : गुरु नानक जयंतीकोल्हापूर जिल्ह्यात सलग १७ तास रिक्षा बंद; प्रवाशांची गैरसोय, विविध ठिकाणी निदर्शनेखेबवड्यातील वर्षानुवर्षे बंद असलेला हातपंप पुन्हा सुरू; सागर भोगम यांच्या पाठपुराव्याला यशयुवाशक्ती फाऊंडेशनच्या भव्य नोकरी मेळाव्यात ५०० युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी; सागर भोगम यांच्याकडून आयोजकांचे कौतुकसहकाररत्न शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांना मान्यवरांकडून अभिवादनकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हशींसह गाय खरेदीसाठीही देणार कर्ज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हशींसह गाय खरेदीसाठीही देणार कर्ज मुख्यमंत्री ग्राम सडक व हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करा : मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हशींसह गाय खरेदीसाठीही देणार कर्ज

schedule23 Nov 26 person by visibility 34 categoryउद्योग

□ दुधाळ म्हशी व गाईंच्या खरेदीसाठी बँकेचे पाऊल        
□दुष्काळी परिस्थितीतही मिळाला शेतकऱ्यांना दिलासा
           
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने परराज्यातील दुधाळ म्हशी खरेदीसाठी विविध शासकीय महामंडळाच्या कर्ज वाटपासह धवलक्रांती ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. या योजनांअंतर्गत दूध संघांच्या विनंतीवरून फक्त म्हशीच खरेदी कराव्यात, असा निर्णय बँकेने घेतला होता. दरम्यान; दुष्काळी परिस्थितीत फ्रेश दुधाची आवश्यकता असल्यामुळे दुधाळ म्हशींबरोबरच दुधाळ गाईंच्या खरेदीसाठीही अर्थपुरवठा करावा अशी मागणी गोकुळ दूध संघ आणि वारणा दूध संघ यांनी केली होती. आज कार्यकारी समितीच्या झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने यापुढे म्हशींसह गायी खरेदीसाठीही अर्थपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. संपूर्ण महाराष्ट्रभर दुष्काळी परिस्थिती असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.
               
याबाबत अधिक माहिती अशी, संपूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नजीकच्या काळात राज्यभर प्रचंड दुधाची टंचाई जाणवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी बँकेने हे धोरण घेतले आहे. 


​केडीसीसी बँकेच्या या आधीपासूनच सुरू असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, महात्मा जोतिबा फुले आर्थिक विकास महामंडळ इत्यादी सरकारी महामंडळांच्या कर्जपुरवठ्यासह धवलक्रांती योजनेसाठीही मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा होतो. या सर्व महामंडळांच्या माध्यमातून रु. १५ लाखांची अर्थ पुरवठा मर्यादा आहे. या अर्थपुरवठ्यातून जेवढे पशुधन येईल त्यापैकी ७५ टक्के अर्थपुरवठा म्हशींसाठी, तर २५ टक्के अर्थपुरवठा गाईंसाठी अशी अट आहे. दोन जनावरे खरेदीच्या धवलक्रांती योजनेअंतर्गतही एक म्हैस आणि एक गाय खरेदी करता येणार आहे. 
​                 
एनडीडीबीची कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज व केर्ली येथे दोन केंद्रे आहेत. या केंद्रांच्या माध्यमातूनही जनावरांची खरेदी केल्यास त्यासाठी मान्यता आहे. तसेच; दुधाळ म्हशींसाठी जातिवंत म्हशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील मुरा ही जात आणि हरियाणामधील जिंद जिल्ह्यातील म्हशींसाठी दहा हजार रुपये अनुदान दिले जात आहे. तसेच; बेंगलोर आणि इतर ठिकाणाहून खरेदी करावयाच्या संकरित दुधाळ गाईंबाबत गोकुळ दूध संघ आणि वारणा दूध संघाची तज्ञ समिती सुचवेल त्या ठिकाणाहून खरेदीसाठीही परवानगी दिली जाणार आहे. अशा संकरित दुधाळ गाईंसाठीही अनुदान दिले जाणार आहे. 
​            
दरम्यान, दुधाळ म्हशी व गाईंच्या खरेदीसाठी केडीसीसी बँकेमार्फत १० हजार रुपये अनुदान दिले जाते. ते २० हजार रुपये करणे बँकेच्या विचाराधीन आहे. दूध संघांचे अनुदानही पुन्हा वाढविले जाणार आहे. त्यामुळे बाजारातील पशुधनाच्या किमती वाढतील, अशी भीती काही संचालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही वाढीव अनुदानाची रक्कम द्यायची की बिनव्याजी कर्ज द्यायचे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी गोकुळ दूध संघ व वारणा दूध संघांची तज्ञ समिती नेमली जाणार आहे. या समित्यांनी शेतकऱ्यांना अनुदान द्यायचे की बिनव्याजी अर्थपुरवठा करायचा, याबाबतचा अहवाल द्यावयाचा आहे. यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना ज्या गोष्टीचा फायदा होईल आणि ज्याप्रमाणे तज्ञ समिती अहवाल देईल त्याप्रमाणे अनुदानाबाबतची अंमलबजावणी होणार आहे. तसेच; शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या जनावरांची पाहणी अहवालाची जबाबदारी गोकुळ दूध संघ आणि वारणा दूध संघावरच राहणार आहे.  
                
□ शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ.......!
उत्पादक शेतकऱ्यांना दुधाळ म्हशी व गाई खरेदीसाठी वाढीव रकमेच्या रूपात अनुदान द्यायचे की पशुधन खरेदीसाठी बिनव्याजी अर्थपुरवठा करायचा याबाबतचा निर्णय तज्ञ समितीच्या अहवालावर अवलंबून राहणार आहे. जी गोष्ट शेतकऱ्यांच्या अधिक फायद्याची असेल त्या गोष्टीची अंमलबजावणी केडीसीसी बँकेकडून होणार आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघ आणि वारणा दूध संघांच्या तज्ञ समितीकडून याबाबतचा अहवाल लवकरात लवकर येणे केडीसीसी बँकेला अपेक्षित आहे. त्यामुळेच वाढीव दहा हजारांचे अनुदान आणि गाईंच्या खरेदीचे धोरण याबाबत स्पष्टताही येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes