SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सैनिक टाकळीत भव्य क्रीडांगण, सैनिकी स्कूल आणि सैनिकी कॅन्टीन उभारणार : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरविकसित भारताच्या निर्मितीत शिक्षकांचे योगदान मोलाचे : केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटीलआंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. मुफज्जल लकडावाला यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कारकेडीसीसी बँक कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांचा व्याजाचा भार उचलणार शिल्लक मतदारांनी गणना फॉर्म जमा करावेत : डॉ. संपत खिलारी२७ कोटींची थकबाकी ! कोल्हापूर महापालिकेने ‘स्टार बझार’ इमारत केली सील; ...पण न्यायालयाच्या स्थगिती आदेशाने काही तासांतच कारवाई स्थगित!कोल्हापूरातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी; भाजपा महिला मोर्चाची मागणी : पोलीस अधीक्षकांना निवेदनराधानगरी १०० टक्के भरले ; 35 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे उघडले गोरगरीब सामान्य माणसांपर्यंत प्रशासन पोहोचावे हीच अपेक्षा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गोकुळ निवडणुकीसाठी कोल्हापूर खंडपीठाने वाढीव कालावधी द्यावा : माणिक पाटील (चुयेकर)

जाहिरात

 

शिल्लक मतदारांनी गणना फॉर्म जमा करावेत : डॉ. संपत खिलारी

schedule31 Jul 26 person by visibility 102 categoryराज्य

कोल्हापूर : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 276 कोल्हापूर (उत्तर) विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 276 कोल्हापूर (उत्तर) विधानसभा मतदारसंघातील ३,०५,४२६ मतदारांपैकी १,०८,८४१ मतदार यांनी गणना फार्म भरून दिले असून त्याचे डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. अद्यापही १,०८,८४१ इतके मतदार गणना फॉर्म देण्याकरता शिल्लक आहेत.

 गणना फॉर्म देणे करता शनिवार दि. १ ऑगस्ट व रविवार दि.२ ऑगस्ट हे सुट्टीचे दिवस असून या दोन्ही दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पूर्ण वेळ मतदान केंद्र परिसरात कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे शिल्लक मतदार यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना त्यांच्या आवश्यक माहितीसह गणना फॉर्म देणे बाबत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ.संपत खिलारी यांनी आवाहन केले आहे.

चालू मतदार यादी तसेच सन 2002 चे मतदार यादी मधील तपशील व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी एल ओ) यांचा संपर्क क्रमांक माहिती करून घेण्यासाठी या electoralsearch.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना आपले गणना फॉर्म जमा करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes