SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सैनिक टाकळीत भव्य क्रीडांगण, सैनिकी स्कूल आणि सैनिकी कॅन्टीन उभारणार : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरविकसित भारताच्या निर्मितीत शिक्षकांचे योगदान मोलाचे : केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटीलआंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. मुफज्जल लकडावाला यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कारकेडीसीसी बँक कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांचा व्याजाचा भार उचलणार शिल्लक मतदारांनी गणना फॉर्म जमा करावेत : डॉ. संपत खिलारी२७ कोटींची थकबाकी ! कोल्हापूर महापालिकेने ‘स्टार बझार’ इमारत केली सील; ...पण न्यायालयाच्या स्थगिती आदेशाने काही तासांतच कारवाई स्थगित!कोल्हापूरातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी; भाजपा महिला मोर्चाची मागणी : पोलीस अधीक्षकांना निवेदनराधानगरी १०० टक्के भरले ; 35 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे उघडले गोरगरीब सामान्य माणसांपर्यंत प्रशासन पोहोचावे हीच अपेक्षा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गोकुळ निवडणुकीसाठी कोल्हापूर खंडपीठाने वाढीव कालावधी द्यावा : माणिक पाटील (चुयेकर)

जाहिरात

 

राधानगरी १०० टक्के भरले ; 35 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे उघडले

schedule31 Jul 26 person by visibility 201 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.35 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 3 व 6 हे खुले झाले असून या स्वयंचलित द्वारामधून 2856 व पावर हाऊस मधून 1400 असा एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

 पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ,कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, बाजार भोगाव, कांटे, करंजफेण व पेंडाखळे, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी व राशिवडे, कुंभी नदीवरील- सांगरुळ दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकूड, वारणा नदीवरील – चिंचोली, माणगाव, कोडोली,खोची व चावरे वेदगंगा नदी वरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे, हिरण्यकेशी नदीवरील- साळगांव, ऐनापूर व निलजी असे एकूण 35 बंधारे पाण्याखाली आहेत. 

  जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी)- राधानगरी 8.35 ( 100 टक्के), तुळशी 2.92 (84.23 टक्के), वारणा 29.48 (85.71 टक्के), दूधगंगा 16.54 (65.14 टक्के), कासारी 2.33 (83.97 टक्के), कडवी 2.50 (99.5 टक्के), कुंभी 2.16 (79.67 टक्के), पाटगाव 2.61 (70.18 टक्के), चिकोत्रा 0.85 (56.1 टक्के), चित्री 1.89 (100 टक्के), जंगमहट्टी 1.22 (100 टक्के), घटप्रभा 1.56 (100 टक्के), जांबरे 0.82 (100 टक्के), आंबेआहोळ 1.15 (92.77 टक्के), सर्फनाला 0.67 (100 टक्के), धामणी 1.29 (33.97 टक्के) टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 30.9, सुर्वे 30.5, रुई 60.10, इचलकरंजी 57.9, तेरवाड 52, शिरोळ 44, नृसिंहवाडी 41.6 तर नजीकच्या सांगली जिल्ह्यातील अंकली येथे 19.8 फूट इतकी पाणीपातळी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes