SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सैनिक टाकळीत भव्य क्रीडांगण, सैनिकी स्कूल आणि सैनिकी कॅन्टीन उभारणार : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरविकसित भारताच्या निर्मितीत शिक्षकांचे योगदान मोलाचे : केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटीलआंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. मुफज्जल लकडावाला यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कारकेडीसीसी बँक कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांचा व्याजाचा भार उचलणार शिल्लक मतदारांनी गणना फॉर्म जमा करावेत : डॉ. संपत खिलारी२७ कोटींची थकबाकी ! कोल्हापूर महापालिकेने ‘स्टार बझार’ इमारत केली सील; ...पण न्यायालयाच्या स्थगिती आदेशाने काही तासांतच कारवाई स्थगित!कोल्हापूरातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी; भाजपा महिला मोर्चाची मागणी : पोलीस अधीक्षकांना निवेदनराधानगरी १०० टक्के भरले ; 35 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे उघडले गोरगरीब सामान्य माणसांपर्यंत प्रशासन पोहोचावे हीच अपेक्षा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गोकुळ निवडणुकीसाठी कोल्हापूर खंडपीठाने वाढीव कालावधी द्यावा : माणिक पाटील (चुयेकर)

जाहिरात

 

कोल्हापूरातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी; भाजपा महिला मोर्चाची मागणी : पोलीस अधीक्षकांना निवेदन

schedule31 Jul 26 person by visibility 127 categoryसामाजिक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कथित बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष माधुरी नकाते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व जलद चौकशी करून संबंधित आरोपींना  कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची, फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली आहे. तसेच तपास त्वरीत पूर्ण करून सक्षम पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी या गुन्ह्यामागील संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यासाठी पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रांचा बेकायदेशीर वापर, अशा यंत्रांचा पुरवठा करणारे, गर्भलिंग निदानासाठी महिलांना प्रवृत्त करणारे तसेच या बेकायदेशीर कृत्यांना सहाय्य करणाऱ्या सर्व व्यक्ती, संस्था व ठिकाणांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय, भविष्यात जिल्ह्यात अशा प्रकारचे बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपाताचे प्रकार घडू नयेत यासाठी विशेष मोहीम राबविणे, संशयित केंद्रांची नियमित तपासणी करणे आणि पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि कन्या भ्रूण संरक्षणासाठी अशा गुन्ह्यांबाबत कोणतीही हयगय न करता निष्पक्ष, पारदर्शक व तातडीने कारवाई करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाला करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक यांनी या गुन्ह्यामधील संपूर्ण रॅकेटवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.  

यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी नकाते, रीमा पालनकर, पल्लवी देसाई, उमा पवार, सुजाता पाटील ई. भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes