SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणारराज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांच्या बक्षीस रक्कमेत भरघोस वाढराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून; अर्थसंकल्प ६ मार्च रोजीआनंदसाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीमधील गैरव्यवहार : ठेवी परत देण्यासाठी जलद गतीने कार्यवाही करावी : सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारलाचित्रपट निर्मितीचा ध्यास बाळगा : रणजित जाधव बी. ए. फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांशी संवादडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे ग्रीडडीबी आयओटी हॅकॅथॉनमध्ये ७५० डॉलर्सचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्तकोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 मार्च रोजीचंबुखडी व पुईखडी येथील थकबाकीदार अपार्टमेंटचे पाणीपुरवठा कनेक्शन खंडितमेन राजाराम मध्ये इ.12 वी च्या विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत

जाहिरात

 

जलद बुद्धिबळ स्पर्धा रविवारी

schedule10 Feb 26 person by visibility 212 categoryक्रीडा

कोल्हापूर :  एकदिवशी सोळा वर्षाखालील मुलांची बुद्धिबळ स्पर्धा रविवार  दि. 22 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. अनुज् चेस ॲकॅडमी व डी आर माने महाविद्यालय यांचे वतीने १६ वर्षांखालील मुला-मुलींची शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 22 फेब्रुवारी  रोजी डी आर माने महाविद्यालय, कागल येथे ही स्पर्धा होईल. 

स्पर्धा १६ वर्षांखालील वयोगटातील सर्व मुलांची एकत्रित एकच स्पर्धा होईल. (जन्म तारीख : १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर), इतर वयोगटात बक्षिसे १४ वर्षांखालील (१/१/२०१२ किंवा त्यानंतर), १२ वर्षांखालील (१/१/२०१४ किंवा त्यानंतर), १० वर्षांखालील (१/१/२०१६ किंवा त्यानंतर), ८ वर्षांखालील (१/१/२०१८ किंवा त्यानंतर).  दि. 21 फेब्रुवारी पर्यंत सहभाग नोंदवावा. 

स्पर्धकांनी स्वतःचा बुद्धिबळपट, चेस क्लॉक, टिफीन घेऊन सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक कृष्णात पाटील (९४२११०४६५०), बाबूराव पाटील (९४२२७९०४९५), डॉ. श्रीनिवास पाटील 9422415818 प्रा. संग्राम तोडकर 9422045741 (क्रीडा शिक्षक - डी आर माने महाविद्यालय), अनुष्का पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes