SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा १५ मार्च रोजीअजितदादा पवार यांच्या पुतळा उभारणीसाठी जागा निश्चितीबाबत महापालिकेत आढावा बैठक​"दिल्ली दरबारी कोल्हापूरचा आवाज! कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपच्या राष्ट्रीय दिग्गजांची भेट" कोल्हापूर: अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा उद्यापासून ४ दिवस दर्शनासाठी बंद!कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या ‘ईद फेस्टिवल’चे 17 मार्च रोजी उद्घाटन!डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या क्रीडापटूंचा भव्य सन्मान सोहळा संपन्नचिकोत्रा नदी पात्रात 'उपसाबंदी' जाहीर! जाणून घ्या तुमच्या भागातील तारीख आणि नियम...राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात मोफत महा-शस्त्रक्रिया अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत 310 यशस्वी शस्त्रक्रिया"राज्यात पावसाची एन्ट्री! १७ मार्चपासून मेघगर्जनेसह बरसणार; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली."

जाहिरात

 

"राज्यात पावसाची एन्ट्री! १७ मार्चपासून मेघगर्जनेसह बरसणार; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली."

schedule13 Mar 26 person by visibility 150 categoryराज्य

मुंबई : 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते.

या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes