कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या ‘ईद फेस्टिवल’चे 17 मार्च रोजी उद्घाटन!
schedule13 Mar 26 person by visibility 223 categoryसामाजिक
कोल्हापूर : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदनिमित्त कोल्हापूरच्या सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या ‘ईद फेस्टिवल’चे आयोजन ईद फेस्टिव्हल कमिटीतर्फे करण्यात आले आहे. बिंदू चौक येथील पार्किंगच्या जागेत मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता या महोत्सवाचे भव्य उद्घाटन कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते पार पडणार आहे.
संस्थापक गणी आजरेकर यांनी २८ वर्षांपूर्वी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात सुरू आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयेशभाई कदम असून, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय राजकीय नेते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात सुकामेवा, मसाले, शेवया, साखर, कांदे-लसूण, क्रॉकरी आणि इतर जीवनावश्यक वस्तू 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेषतः बिर्याणी तांदळाचे ५ व १० किलोचे पॅक अत्यंत सवलतीच्या दरात मिळतील.
सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक गणी आजरेकर व संयोजन समितीने केले आहे.