चिकोत्रा नदी पात्रात 'उपसाबंदी' जाहीर! जाणून घ्या तुमच्या भागातील तारीख आणि नियम...
schedule13 Mar 26 person by visibility 134 categoryराज्य
कोल्हापूर : चिकोत्रा प्रकल्पाच्या चिकोत्रा नदी भागामध्ये पाटबंधारे विभाग (दक्षिण)चे कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे यांनी पाटबंधारे अधिनियम 1976 नुसार शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसाबंदी लागू केली आहे.
चिकोत्रा नदी को.प. बंधारा 1 ते को.प. बंधारा बेळुंखी (29) वर 21 ते 29 मार्चपर्यंत, 18 ते 26 एप्रिलपर्यंत, 16 ते 24 मे याप्रमाणे उपसाबंदी करण्यात आली आहे.
उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसा यंत्र जप्त करुन परवानाधारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल. होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असे पाटबंधारे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.