SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रोटरी क्लब शिरोली एमआयडीसीच्या वतीने व्होकेशनल अवॉर्ड पुरस्काराने मान्यवरांचा गौरव सामाजिक सकारात्मकता वाढविणारा : संग्राम पाटीलसकारात्मक ऊर्जाप्राप्तीसाठी योगसाधना आवश्यक : खासदार धनंजय महाडिक; शिवाजी विद्यापीठात ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग-संगम’ कार्यक्रमभक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयोगसंपन्न कर्मचारी गोकुळच्या यशाची गुरुकिल्ली ! : नविद मुश्रीफ; ‘गोकुळ’मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजराआषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदानपुराच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडी, प्रयाग चिखली परिसराची पाहणीआर एस एस डी आय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीने कोल्हापुरात २१ जून रोजी मधुमेहींसाठी परिसंवादाचे आयोजनहजयात्रीॅचे कोल्हापूर विमानतळावर जंगी स्वागतमनाेहर जाेशी यांना ’लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्कारसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रा. स्वप्निल ठिकणे यांना डॉक्टरेट पदवी

जाहिरात

 

आर एस एस डी आय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीने कोल्हापुरात २१ जून रोजी मधुमेहींसाठी परिसंवादाचे आयोजन

schedule20 Jun 25 person by visibility 272 categoryआरोग्य

कोल्हापूर : आर एस एस डी आय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीने वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपक्रम राबवले जातात. सध्या मधुमेहाचं प्रमाण वाढत असून, मधुमेहाची नेमकी व्याख्या काय, मधुमेहींनी आपली दिनचर्या कशी ठेवावी, आहारमध्ये कोणते पदार्थ असावेत, औषधं कोणती घ्यावीत, असे अनेक प्रश्न रुग्णांना भेडसावत असतात. या पार्श्वभूमीवर मधुमेहाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं तज्ञ डॉक्टरांकडून मिळावीत. या हेतूने ओळख मधुमेहाची हा मधुमेह तज्ञांसोबतचा परिसंवाद आयोजित केला आहे.शनिवार २१ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ यावेळेत देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती या संस्थेचे कोल्हापूरचे समन्वयक डॉ. राजेश देशमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आर एस एस डी आय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीनं, आयोजित केलेल्या या परिसंवादाला खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, या प्रतिसंवादात मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलचे मधुमेह तज्ञ डॉ. विजय पाणीकर, मुंबईचे मधुमेह तज्ञ डॉ. विजय नेगलूर, डॉ. लोतीका पुरोहित, डॉ. संहिता वालावलकर, डॉ. राजीव कोविल, डॉ. मयूरा काळे आणि डॉ. निखिल नाशीककर हे तज्ञ डॉक्टर मधुमेहाबाबत परिपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.

 विशेषबाब म्हणजे या कार्यक्रमांतर्गत मधुमेह, लठ्ठपणा आणि ३० पेक्षा जास्त बीएमआय असणाऱ्या सुमारे १२० ते १५० रूग्णांसाठी बाजारात २ हजार ते ३ हजार रुपये आकारणी केली जाणारी फायब्रोस्कॅन तपासणी या ठिकाणी मोफत केली जाणार आहे. या मोफत तपासणीचा लाभ घेण्यासाठी ९६३७३०२४२४ या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आणि शनिवारी २१ जूनला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. राजेश देशमाने यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला एन्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. शर्विल गाडवे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes