SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रोटरी क्लब शिरोली एमआयडीसीच्या वतीने व्होकेशनल अवॉर्ड पुरस्काराने मान्यवरांचा गौरव सामाजिक सकारात्मकता वाढविणारा : संग्राम पाटीलसकारात्मक ऊर्जाप्राप्तीसाठी योगसाधना आवश्यक : खासदार धनंजय महाडिक; शिवाजी विद्यापीठात ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग-संगम’ कार्यक्रमभक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयोगसंपन्न कर्मचारी गोकुळच्या यशाची गुरुकिल्ली ! : नविद मुश्रीफ; ‘गोकुळ’मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजराआषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदानपुराच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडी, प्रयाग चिखली परिसराची पाहणीआर एस एस डी आय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीने कोल्हापुरात २१ जून रोजी मधुमेहींसाठी परिसंवादाचे आयोजनहजयात्रीॅचे कोल्हापूर विमानतळावर जंगी स्वागतमनाेहर जाेशी यांना ’लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्कारसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रा. स्वप्निल ठिकणे यांना डॉक्टरेट पदवी

जाहिरात

 

पुराच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडी, प्रयाग चिखली परिसराची पाहणी

schedule20 Jun 25 person by visibility 200 categoryराज्य

कोल्हापूर : करवीर उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी आज प्रयाग चिखली, आंबेवाडी व रेडेडोह येथे संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर पाहणी दौरा केला. या वेळी तहसीलदार करवीर, ग्रामस्तरीय सर्व कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी चौगुले यांनी सन 2019, 2021 व 2024 मध्ये आलेल्या पुरपरिस्थितीचा आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या स्थलांतराचा सविस्तर आढावा घेतला. यंदाही संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांचे सुरक्षितपणे स्थलांतर झाल्यानंतर त्यांच्या निवारागृहांची स्थिती चांगली राखण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.

विशेषतः गरोदर माता, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व जनावरांसाठी सुरक्षित जागी स्थलांतर करण्यावर भर देण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांनी 24 तास मुख्यालयात उपस्थित राहावे आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती तात्काळ तालुका नियंत्रण कक्षाला कळवावी, असेही आदेश त्यांनी दिले. या कामकाजात हलगर्जीपणा आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश श्रीमती चौगुले यांनी यावेळी दिले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes