SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
तंत्रज्ञान अधिविभागात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारला प्रतिसादकोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी व्यापक बैठकीचे पालकमंत्र्याकडून ठोस आश्वासनमेन‌ राजाराम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घेतला योगासनाचा प्रात्यक्षिक अनुभवडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी.स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान ६.0 राबविणार : पंकजा मुंडेरोटरी क्लब शिरोली एमआयडीसीच्या वतीने व्होकेशनल अवॉर्ड पुरस्काराने मान्यवरांचा गौरव सामाजिक सकारात्मकता वाढविणारा : संग्राम पाटीलसकारात्मक ऊर्जाप्राप्तीसाठी योगसाधना आवश्यक : खासदार धनंजय महाडिक; शिवाजी विद्यापीठात ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग-संगम’ कार्यक्रमभक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयोगसंपन्न कर्मचारी गोकुळच्या यशाची गुरुकिल्ली ! : नविद मुश्रीफ; ‘गोकुळ’मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजराआषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान

जाहिरात

 

योगसंपन्न कर्मचारी गोकुळच्या यशाची गुरुकिल्ली ! : नविद मुश्रीफ; ‘गोकुळ’मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

schedule21 Jun 25 person by visibility 248 categoryआरोग्य

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) २१ जून 'जागतिक योग दिन' अत्यंत उत्साहात व सकारात्मक वातावरणात संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली व संचालक यांच्‍या उपस्थितीत साजरा करण्यात आला. गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयातील प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योग शिक्षक अशोक पालकर यांनी योगाचे महत्‍व पटवून देवून प्रात्‍यक्षिके करुन दाखवलीत. यावेळी गोकुळचे संचालक, विभागप्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर कुशल योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम, विविध योगासने, ध्यानधारणा इ. क्रियांचा सराव करण्यात आला. सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून सहभाग नोंदवत सकारात्मक ऊर्जा आणि ताजेपणाचा अनुभव घेतला.

 या प्रसंगी मार्गदर्शन करताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर समतोल आहे. निरोगी शरीर, शांत आणि सकारात्मक मन, तसेच चांगली कामगिरी यासाठी दररोज योग सराव करणे गरजेचे आहे. गोकुळमधील प्रत्येक कर्मचारी, अधिकारी आणि सभासदांनी हा संकल्प करायला हवा. कारण कर्मचारी जर तंदुरुस्त आणि आनंदी असतील तर त्यांच्या कामातून गोकुळ संघाची उत्पादनक्षमता, कार्यक्षमता आणि संपूर्ण कार्यसंस्कृती बळकट होईल.

 या कार्यक्रमात मार्गदर्शक करताना ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, योगामुळे मन:शांती मिळते, कार्यक्षमतेत वाढ होते व व्यावसायिक दडपणातून मुक्तता मिळते. गोकुळ संघाच्या प्रत्येक स्तरावर आरोग्यप्रेमी संस्कृती रुजवण्यासाठी असे उपक्रम दरवर्षी घेतले जातील.

 तसेच गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, योग दिनानिमित्य दर रविवार कर्मचाऱ्यांना एक तास योगाचे सत्र सुरु ठेवण्याच्या नियोजन करावे असे मनोगत व्यक्त केले.   

▪️नव्या पिढीकडून योग संस्कृतीचा स्वीकार : गोकुळ योग दिन शिबिरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नात व चेअरमन नविद मुश्रीफ यांची कन्या आऐझा मुश्रीफ हिने सहभाग घेतला. लहान वयातच योगाची आवड दाखवत तिने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. नव्या पिढीतही योगाची संस्कृती रुजत असल्याचे या प्रसंगी दिसून आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एम.पी.पाटील यांनी केले. आभार डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी मांडले. 

 याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बाळासो खाडे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, जगदीश पाटील, हणमंत पाटील, योग शिक्षक डॉ. विलासराव देशमुख, मारुती शिंदे, बाजीराव पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes