SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रोटरी क्लब शिरोली एमआयडीसीच्या वतीने व्होकेशनल अवॉर्ड पुरस्काराने मान्यवरांचा गौरव सामाजिक सकारात्मकता वाढविणारा : संग्राम पाटीलसकारात्मक ऊर्जाप्राप्तीसाठी योगसाधना आवश्यक : खासदार धनंजय महाडिक; शिवाजी विद्यापीठात ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग-संगम’ कार्यक्रमभक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयोगसंपन्न कर्मचारी गोकुळच्या यशाची गुरुकिल्ली ! : नविद मुश्रीफ; ‘गोकुळ’मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजराआषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदानपुराच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडी, प्रयाग चिखली परिसराची पाहणीआर एस एस डी आय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीने कोल्हापुरात २१ जून रोजी मधुमेहींसाठी परिसंवादाचे आयोजनहजयात्रीॅचे कोल्हापूर विमानतळावर जंगी स्वागतमनाेहर जाेशी यांना ’लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्कारसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रा. स्वप्निल ठिकणे यांना डॉक्टरेट पदवी

जाहिरात

 

हजयात्रीॅचे कोल्हापूर विमानतळावर जंगी स्वागत

schedule20 Jun 25 person by visibility 346 categoryसामाजिक

 कोल्हापूर  : कोल्हापूर, बेळगाव  सांगली व रत्नागिरी जिल्ह्यातून जे लोक हजला सौदी अरबमध्ये मक्का मदीनाला  गेले होते. त्यापैकी ४० हाजीयात्रींचे आज शुक्रवारी २० जून रोजी  दुपारी बारा वाजता  सौदी अरब  मदीना  व्हाया  हैदराबाद मार्गे कोल्हापुरातील  छत्रपती राजाराम महाराज  विमानतळावर आगमन झाले. यावेळी कोल्हापूर हज कार्पोरेशनतर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
 
यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कोल्हापूर हाज कार्पोरेशन अध्यक्ष इस्माईल मकानदार,  मुस्ताक मकानदार, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादरभाई मलबारी, चांद जत्राटे,  समीर जमादार,  अजीम  फुलवाले, समाधान हेगडकर, यांनी हाजीना हार घालून स्वागत केले.
 
 प्रथमच कोल्हापूर एअरपोर्टला इंटरनॅशनल कनेक्शन निर्माण झालेला आहे. यामुळे भविष्यामध्ये कोल्हापूर विमानतळावरून सुमारे 2000 हाज यात्रेकरू जातील आणि येतानाही कोल्हापूर विमानतळापर्यंत त्यांना सेवा मिळेल .त्यामुळे निश्चित फ्लाईट मध्ये वाढ होऊन कोल्हापूर इंटरनॅशनल एअरपोर्टच्या 
 बाजूने पाऊल पडत आहे. असे मत गणी आजरेकर यांनी व्यक्त केले.
 
 हज यात्रेकरूंना हैदराबाद किंवा मुंबईमध्ये वेटिंग न करता जलद विमानसेवा उपलब्ध झाल्यामुळे वेळेची बचत होऊन लवकर कोल्हापुरात हज यात्रेकरू दाखल झाले. यामुळे  हाजी लोकांनी समाधान व्यक्त केले. असे पत्रक कोल्हापूर हज कार्पोरेशनचे हाजी इस्माईल मकानदार यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes