SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाला समविचारीचे न्यायालयात आव्हान; उद्या सर्किट बेंचमध्ये सुनावणी गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात उद्या संघर्ष मोर्चाआदिवासी पाड्यात मंत्री मंगलप्रभात लोढा यांची दिवाळी; चिमुकल्यांना दिल्या भेटवस्तूंच्या अनमोल भेटी; शैक्षणिक साहित्य, खेळणी, फटाके आणि सायकलींचे वाटपआदिवासी पाड्यात मंत्री मंगलप्रभात लोढा यांची दिवाळी; चिमुकल्यांना दिल्या भेटवस्तूंच्या अनमोल भेटी; शैक्षणिक साहित्य, खेळणी, फटाके आणि सायकलींचे वाटपशेतीच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी केली शेतातील पिकांची पाहणी; सोनेगाव रिठी व कोहळी येथील शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथादिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी साजरी केली दिव्यांग बांधवांसोबत आनंदाची दिवाळी!राशिवडे येथे दुध उत्पादक शेतकरऱ्यांच्यावतीने शासनाच्या अध्यादेशाची होळीकरून निषेध दुष्काळी परिस्थितीत पाणी बचतीसाठी खोडवा उसात ‘एक आड एक सरीत पाचट आच्छादन’ कराकोल्हापूर : दुर्गम भागात दिवाळी साहित्य वितरणसरपंचांनी मांडल्या ग्रामविकासाच्या संकल्पना; दिलेल्या निवेदनाच्या पोहाेच पावतीची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जाहिरात

 

राशिवडे येथे दुध उत्पादक शेतकरऱ्यांच्यावतीने शासनाच्या अध्यादेशाची होळीकरून निषेध

schedule08 Nov 26 person by visibility 325 categoryसामाजिक

राशिवडे :   गोकुळ दुध संघाच्या निवडणूकीत बहुमत मिळालेल्या समविचारी आघाडीच्या संचालकांना सता स्थापनेची संधी मिळण्यापूर्वीच राज्य शासनाने नवीन  अध्यादेश काढून  स्वीकृत शासकीय संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्याच्या निर्णयाविरोधात राशिवडे येथील  दुध उत्पादक शेतकरी सभासदांच्या वतीने  शासनाच्या अध्यादेशाची होळी करुन महायुती शासनाच्या हुकूमशाही दडपशाही निर्णयाविरोधात तीव्र निषेध करण्यात आला. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर धुंदरे यांनी कोल्हापूरचा स्वाभिमान आणि दुध उत्पादकांची ताकद दाखवून देण्यासाठी तसेच  गोकुळ ब्रॅण्ड वाचविण्यासाठी  सोमवार दि.९ नोव्हेंबर च्या मोर्चात राशिवडे जिल्हा परिषद परिषद मतदार संघातील सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. 

 माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य मोहन धुंदरे राशिवडे यांनी  हुकूमशाही मोडीत काढून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरकारला धडकी भरवणारा मोर्चा काढण्याचा निर्धार केला.  ग्रामपंचायत  उपसरपंच  प्रकाश पोवार यांनी   महायुती शासन गोकुळ दुध संघ बळकविण्यासाठी घाणेरडे  राजकारण करत असल्याचा आरोप केला. 

शेतकरी दूध संस्थेचे चेअरमन  शिवाजी चौगले यांनी  महायुती शासन गोकुळ दुध संघ बळकविण्यासाठी घाणेरडे  राजकारण करत असल्याचा आरोप केला. 
यावेळी  जिल्हा परिषद सदस्य सागर धुंदरे  माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य मोहन धुंदरे  उपसरपंच  प्रकाश पोवार  ग्रामपंचायत सदस्य  अजिंक्य गोनुगडे  आनंदराव धुंदरे  सर्जेराव गोंगाणे  माजी  सरपंच  बापूसो गोंगाणे  माजी उपसरपंच आर.डी.चौगले  भारत सेवा संस्थेचे चेअरमन दिनकर शिंदे शेतकरी दूध संस्थेचे चेअरमन  शिवाजी चौगले  ज्ञानदेव चांदणे  सुभाष शिंदे  नंदकुमार नकाते  संतोष बिल्ले  आनंदा सुतार  सागर मगदूम  चंद्रकांत पाटील सुनील बिल्ले  राजेंद्र डकरे धिरज  धुंदरे   रणजित धुंदरे रंगराव गोंगाणे  आदी दुध उत्पादक शेतकरी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes