आदिवासी पाड्यात मंत्री मंगलप्रभात लोढा यांची दिवाळी; चिमुकल्यांना दिल्या भेटवस्तूंच्या अनमोल भेटी; शैक्षणिक साहित्य, खेळणी, फटाके आणि सायकलींचे वाटप
schedule08 Nov 26 person by visibility 120 categoryराज्य
मुंबई : राज्यात दुष्काळाचे सावट असताना शेतकरी आणि आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गोरेगाव पूर्वेकडील आरे मिल्क कॉलनी परिसरातील खांबांचा पाडा येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी लहान मुलांना शैक्षणिक साहित्य, खेळणी, फटाके, बिस्किटे आणि सायकलींचे वाटप करून त्यांच्या आनंदात भर घातली.
वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र आणि लोढा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरे मिल्क कॉलनीतील युनिट क्रमांक २५ मधील खांबांचा पाडा येथे झालेल्या या कार्यक्रमात मंत्री लोढा यांनी आदिवासी कुटुंबीयांशी संवाद साधत दिवाळीचा आनंद त्यांच्यासोबत साजरा केला.
या उपक्रमांतर्गत लोढा फाऊंडेशनच्या माध्यमातून दुरुस्ती करून वापरण्यायोग्य बनवलेल्या सायकली आणि खेळण्यांचे गरजू मुलांना वाटप करण्यात आले. तसेच मुलांना दिवाळीचा फराळ, फटाके, बिस्किटे आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री लोढा म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी शेतकरी आणि आदिवासी बांधवांसोबत साजरी करण्याचे आवाहन केले आहे. आरे कॉलनी परिसरात एकूण २७ आदिवासी पाडे आहेत. राज्याचा मंत्री आणि मुंबई उपनगराचा सहपालकमंत्री म्हणून या भागातील नागरिकांना आवश्यक असलेली कोणतीही मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे.
शहरातील नागरिकांकडून वापरात नसलेल्या वस्तू जमा करून लोढा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांची दुरुस्ती केली जाते. त्यानंतर सायकली आणि खेळणी यांसारख्या वस्तू गरजू मुलांपर्यंत पोहोचवल्या जातात. यापुढे दरवर्षी वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनुभव आतापर्यंतच्या सर्वांत खास दिवाळीच्या आठवणींपैकी एक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी पारंपरिक तारपा नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. या नृत्याचा उत्साह पाहून मंत्री मंगलप्रभात लोढा यांनाही नृत्यात सहभागी होण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी आदिवासी बांधवांसोबत तारपा नृत्याचा आनंद घेतला. तसेच लहान मुलांसोबत फटाके फोडून आणि घरोघरी जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांनी सणाचा आनंद द्विगुणित केला.
याप्रसंगी नगरसेविका प्रीती साटम, वनवासी कल्याण आश्रमचे कार्याध्यक्ष सुशील जाजू यांच्यासह अन्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
आदिवासी पाड्यात मंत्री मंगलप्रभात लोढा यांची दिवाळी; चिमुकल्यांना दिल्या भेटवस्तूंच्या अनमोल भेटी; शैक्षणिक साहित्य, खेळणी, फटाके आणि सायकलींचे वाटप
schedule08 Nov 26 person by visibility 126 categoryराज्य