SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पर्यावरणाचा समतोल आणि मधमाशी दिनकोल्हापूर : अनाधिकृत बांधकाम कारवाईस उच्च न्यायालयाची स्थगिती नकार; महापालिकेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेशकोल्हापूर जिल्ह्यात 2 जूनपर्यंत बंदी आदेश लागूशक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पेटला आंदोलनाचा वणवा; २१ हजार एकर जमिनीचा घास घेणाऱ्या प्रकल्पाविरोधात ९ जूनला बळीराजाचा महामोर्चापुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’लिंगनूरची तालीम आणि मैदानासाठी लागेल ते सहकार्य करू : मंत्री हसन मुश्रीफ दहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय : डॉ. महादेव नरकेडी. वाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के सांगलीतील खुल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयकोल्हापूर : घरफाळा देयक वितरणास सुरुवात, चालू देयकावर 6 टक्के सवलतकुटुंबाच्या आरोग्याचा भक्कम आधार: फॅमिली डॉक्टर

जाहिरात

 

कोल्हापूर : घरफाळा देयक वितरणास सुरुवात, चालू देयकावर 6 टक्के सवलत

schedule19 May 26 person by visibility 520 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका कर आकारणी व वसुली विभागामार्फत (घरफाळा) सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी शहरातील एकूण 1 लाख 71 हजार 978 मिळकतींची देयके तयार करण्यात आली असून, सदर देयकांचे पोस्ट विभागामार्फत वितरण सुरू करण्यात आले आहे.

 महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व मिळकतधारकांना आवाहन केले आहे की, घरफाळा देयक वितरणासाठी येणाऱ्या पोस्टमन यांना आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आदी परिपूर्ण माहिती द्यावी. या माहितीच्या आधारे महानगरपालिकेकडून घरफाळा सवलत योजना तसेच इतर महत्त्वाची माहिती मोबाईलद्वारे मिळकतधारकास सहज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  सन 2026-27 या आर्थिक वर्षातील चालू मागणीवरील महापालिकेच्या घरफाळयामध्ये 6 टक्के सवलत योजना लागू करण्यात आली असून, शहरातील सर्व मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 ही जमा मिळकतधारकांना महानगरपालिकेच्या कोणत्याही नागरी सुविधा केंद्रात जाऊन आपला करदाता क्रमांक सांगून चालू वर्षाचा घरफाळा भरता येणार असून, त्याद्वारे 6 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम तसेच महानगरपालिकेच्या वेबसाईटद्वारेही ऑनलाईन घरफाळा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन कर भरण्यासाठी:propertytax.kolhapurcorporaction.gov.in या लिंकचा वापर करावा असे आवाहन घरफाळा विभागाने केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes