SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सीपीआर हॉस्पिटलचा हृदयरोग विभाग महाराष्ट्रात क्रमांक - 1; सर्वाधिक 11 TAVI यशस्वी शस्त्रक्रियाशिवाजी विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कौतुकास्पद: आनंदराव पाटील; विद्यापीठाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहातगर्दीचा फायदा घेऊन सोन्याची गंठण चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेस अटककरवीर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादनहिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन...!डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलहिवाळी अधिवेशनात न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीचा प्रश्न मांडणार; सतेज पाटील : न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाला काँग्रेसचा पाठिंबा कोल्हापूर : साठमारी परिसरातील घरफाळ्याची थकबाकी न भरल्याने आठ गाळे सीलASDD प्रवर्गातील मतदारांना नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधीनिवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन हयातीचे दाखले सादर करावेत

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. रविंद्र धोंगडी यांना ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड’ने सन्मानित

schedule17 Nov 26 person by visibility 246 categoryसामाजिक

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रा. रविंद्र पुरुषोत्तम धोंगडी यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित विशेष गौरव सोहळ्यात ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

आधार सोशल फाउंडेशनतर्फे शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रा. रविंद्र पुरुषोत्तम धोंगडी यांना त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रा. धोंगडी यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीत गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, संस्थात्मक विकास आणि शैक्षणिक नेतृत्व या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना २००६ साली आदर्श शिक्षक पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, गेल्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे २००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक व करिअरविषयक मार्गदर्शन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. तसेच नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या विशेष संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांनाही त्यांनी वेळोवेळी आर्थिक व शैक्षणिक मदतीचा हात दिला आहे.

या पुरस्काराबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी,  तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रा. रविंद्र धोंगडी यांचे अभिनंदन करून  त्यांच्या पुढील  कार्यास शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes