प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
schedule16 Apr 26 person by visibility 213 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल कोल्हापूर मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्राचार्या /मुख्याध्यापिका सविता पाटील व उपप्राचार्य साबळे सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते क्रीडा शिक्षक महेश सूर्यवंशी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील विविध जाती-धर्मांना एकत्रित ठेवण्याचे कार्य केले. सामाजिक न्याय, दलित हक्क तसेच भारतीय संविधान निर्मितीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या सौ सविता पाटील यांनी कायदेतज्ञ, घटनातज्ञ, कृषितज्ज्ञ, जलतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ असणाऱ्या महामानवाला आजच्या पिढीने डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यामध्ये घेण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक व्ही. एम मंडलिक यांनी केले, तर सौ एस एस गोणी यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास पर्यवेक्षक भोई व कॉलेज व शाळेमधील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.