SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावीकोल्हापूर शहर वाहतूक शाखेचा दणका; १५१ रिक्षाचालकांवर कारवाई, ७७ हजारांचा दंड वसूलअतिक्रमणधारकांनो सावधान! तटाकडील तालीम ते महाद्वार रोडपर्यंत पालिकेची जोरदार धडक मोहीमसीबीएसई बोर्ड परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी RIMC प्रवेशपात्रता परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढजिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावाई-आर-1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत भरण्याचे आवाहनसेवा हक्क दिन आढावा बैठक संपन्नडी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये द्वितीयविरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेश

जाहिरात

 

डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये द्वितीय

schedule16 Apr 26 person by visibility 129 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी आष्टा येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ‘वेब बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम’ लक्षवेधी ठरली. 

अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील ५० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ८०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी मेडिकेयर फील्ड मधील ‘वेब बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम’ हा प्रोजेक्ट सादर केला. या संघाला द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

विजयी संघात संगणक अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या ऐश्वर्या देसाई, सारथी पाटील, आर्य सुतार, सुमित मुळे व स्वरूप पाल या पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या संघाला  २० हजार रुपयांचे रोख पारितोषिकही प्रदान करण्यात आले.


या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के . गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. राधिका ढणाल यांनी संघातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes