विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेश
schedule16 Apr 26 person by visibility 173 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नुतन विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयाचा आमदार सतेज उर्फ बंटी.डी.पाटील यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला.
यावेळी महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृहनेता मुरलीधर जाधव, माजी आमदार ऋतूराज पाटील, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे,
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.