RIMC प्रवेशपात्रता परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
schedule08 Apr 26 person by visibility 104 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा 7 जून रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आवेदनपत्र स्वि(कारण्याच्या अंतिम मुदतीत बदल करण्यात आला आहे.
आर.आय.एम.सी., डेहराडूनचे कमांडर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ज स्वीकारण्याची पूर्वीची अंतिम तारीख 5 एप्रिल होती. ती आता वाढवून 15 एप्रिल करण्यात आली आहे.
परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सुधारित मुदतीत आपले आवेदनपत्र सादर करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी केले.