SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावीकोल्हापूर शहर वाहतूक शाखेचा दणका; १५१ रिक्षाचालकांवर कारवाई, ७७ हजारांचा दंड वसूलअतिक्रमणधारकांनो सावधान! तटाकडील तालीम ते महाद्वार रोडपर्यंत पालिकेची जोरदार धडक मोहीमसीबीएसई बोर्ड परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी RIMC प्रवेशपात्रता परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढजिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावाई-आर-1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत भरण्याचे आवाहनसेवा हक्क दिन आढावा बैठक संपन्नडी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये द्वितीयविरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेश

जाहिरात

 

ई-आर-1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत भरण्याचे आवाहन

schedule16 Apr 26 person by visibility 111 categoryराज्य

  कोल्हापूर : सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासन व राज्य शासन अंगिकृत व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरणपत्र 30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.

  मार्च 2026 रोजी समाप्त होत असलेल्या तिमाहीची ई-आर-1 (त्रैमासिक) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरुष/स्त्री ) संकलीत करण्याचे काम सुरु आहे. सांख्यिकी विभागाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आले आहेत. ई-आर 1 विवरणपत्र सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाही नंतर महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे.

  अधिक माहितीसाठी या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रामचंद्र पांढरे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9158432640 तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे www.rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ पहावे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes