अर्थशास्त्र अधिविभागात पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा
schedule15 Sep 26 person by visibility 253 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागातील इकॉनॉमिक्स क्लबतर्फे पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध आर्थिक विषयांवर नाविन्यपूर्ण मांडणी केली.
विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्या हस्ते आणि अधिविभागाचे प्रमुख डॉ. महादेव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पोस्टर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध आर्थिक, सामाजिक आणि समकालीन विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. डॉ. कविता वड्राळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. क्लबचे समन्वयक डॉ. डी. आर. ननवरे व डॉ. दिग्विजय पाटील यांनी संयोजन केले.