SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जजयसिंगपुरात १० ऑक्टोबरला ऊस परिषद ! १५ ऑक्टोबरच्या साखर गळीत हंगामाला 'स्वाभिमानी'चा सक्त विरोधभविष्याची ढाल: जागतिक ओझोन संरक्षण दिनकोल्हापुर महानगरपालिका : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर १५ दिवसांत २२२ जणांवर कारवाईगोकुळ पंचवार्षिक निवडणूक : शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुट्टीकोल्हापुरात महसूल न्यायाधिकरणाचे स्वतंत्र खंडपीठ स्थापन करा; पालकमंत्री आबिटकर यांची मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्याकडे मागणी‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये १७ सप्टेंबरला स्वच्छता मोहीमदृष्टिहीन नागरिकांसाठी काम करत असलेल्या संस्थेस निधी द्या : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड‘आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा : डॉ. चाणक्य कुमार झा यांचे आवाहनडीकेटीई-मध्ये गणेशोत्सव २०२६ अंतर्गत राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका या संकल्पनेतून सजावट

जाहिरात

 

कोल्हापुर महानगरपालिका : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर १५ दिवसांत २२२ जणांवर कारवाई

schedule15 Sep 26 person by visibility 287 categoryमहानगरपालिका

◼️२ लाख ७८ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल

कोल्हापूर : शहरातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने प्लास्टिकचा वापर करणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, उघड्यावर लघुशंका करणारे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे, रस्त्यावर खरमाती टाकणारे तसेच उघड्यावर कचरा टाकणारे नागरिक व आस्थापनांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत दि. १ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २२२ व्यक्तींवर कारवाई करून २ लाख ७८ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार व उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

  महापालिकेच्या कारवाईमध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्या ११३ नागरिक व व्यावसायिकांकडून १ लाख ५० हजार ३५० रुपये, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या ८३ नागरिकांकडून ९४ हजार ३०० रुपये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, लघुशंका व थुंकणाऱ्या १९ व्यक्तींकडून ११ हजार ३०० रुपये, तर रस्त्यावर खरमाती टाकणाऱ्या ७ व्यक्तींकडून २२ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

  शहरातील स्वच्छता अबाधित राहावी, सार्वजनिक ठिकाणी होणारे उपद्रव रोखले जावेत तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने महापालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.

  महापालिकेच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, दैनंदिन कचरा केवळ महापालिकेच्या अधिकृत घंटागाडीकडेच द्यावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर कचरा जाळणे, रस्त्यावर अथवा नाल्यात कचरा टाकणे तसेच प्लास्टिक वापराबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणे आढळून आल्यास लागू नियम व संबंधित कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार संबंधितांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes