SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जजयसिंगपुरात १० ऑक्टोबरला ऊस परिषद ! १५ ऑक्टोबरच्या साखर गळीत हंगामाला 'स्वाभिमानी'चा सक्त विरोधभविष्याची ढाल: जागतिक ओझोन संरक्षण दिनकोल्हापुर महानगरपालिका : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर १५ दिवसांत २२२ जणांवर कारवाईगोकुळ पंचवार्षिक निवडणूक : शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुट्टीकोल्हापुरात महसूल न्यायाधिकरणाचे स्वतंत्र खंडपीठ स्थापन करा; पालकमंत्री आबिटकर यांची मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्याकडे मागणी‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये १७ सप्टेंबरला स्वच्छता मोहीमदृष्टिहीन नागरिकांसाठी काम करत असलेल्या संस्थेस निधी द्या : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड‘आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा : डॉ. चाणक्य कुमार झा यांचे आवाहनडीकेटीई-मध्ये गणेशोत्सव २०२६ अंतर्गत राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका या संकल्पनेतून सजावट

जाहिरात

 

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये १७ सप्टेंबरला स्वच्छता मोहीम

schedule15 Sep 26 person by visibility 245 categoryराज्य

कोल्हापूर : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापासून तलाठी कार्यालयापर्यंतच्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. कार्यालय प्रमुखांसह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहिमेत वैयक्तिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

या मोहिमेत कार्यालय परिसरातील गवत, झुडपे व कचरा काढणे, कार्यालयाची स्वच्छता, दप्तराचे निंदणीकरण,सहा गठ्ठे पध्दती, अभिलेख कक्षातील सर्व दस्तऐवज सुव्यवस्थित लावून घेणे, जाळे-जळमटे व धूळ काढणे, तसेच अनावश्यक कागदपत्रे, निकामी साहित्य व इतर अनावश्यक वस्तुंची नियमानुसार विल्हेवाट लावणे आदी कामे करण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकेची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे.

स्वच्छता मोहिमेपूर्वी, मोहिमेदरम्यान व मोहिमेनंतरची छायाचित्रे तसेच किमान पाच व्हिडीओ तयार करून केलेल्या कामाचा एकत्रित अहवाल छायाचित्रे व व्हिडीओसह संबंधित कार्यालय, कार्यासन प्रमुखांनी २१ सप्टेंबर पर्यंत सादर करा. मोहिमेचा कालावधी सकाळी ७ ते ८.३० असा असून, त्यानंतरच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता सर्व कार्यालय प्रमुखांनी घ्यावी, असे निर्देशित केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes