SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जजयसिंगपुरात १० ऑक्टोबरला ऊस परिषद ! १५ ऑक्टोबरच्या साखर गळीत हंगामाला 'स्वाभिमानी'चा सक्त विरोधभविष्याची ढाल: जागतिक ओझोन संरक्षण दिनकोल्हापुर महानगरपालिका : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर १५ दिवसांत २२२ जणांवर कारवाईगोकुळ पंचवार्षिक निवडणूक : शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुट्टीकोल्हापुरात महसूल न्यायाधिकरणाचे स्वतंत्र खंडपीठ स्थापन करा; पालकमंत्री आबिटकर यांची मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्याकडे मागणी‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये १७ सप्टेंबरला स्वच्छता मोहीमदृष्टिहीन नागरिकांसाठी काम करत असलेल्या संस्थेस निधी द्या : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड‘आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा : डॉ. चाणक्य कुमार झा यांचे आवाहनडीकेटीई-मध्ये गणेशोत्सव २०२६ अंतर्गत राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका या संकल्पनेतून सजावट

जाहिरात

 

डीकेटीई-मध्ये गणेशोत्सव २०२६ अंतर्गत राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका या संकल्पनेतून सजावट

schedule15 Sep 26 person by visibility 325 categoryशैक्षणिक

इचलकरंजी :  डीकेटीईमध्ये नेहमीच समाजउपयोगी विषयावर प्राधान्य दिले जाते गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा जपत यावेळी डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी यंदा राष्ट्रनिर्मितीत युवकांची भुमिका ही प्रेरणादायी संकल्पना साकारली आहे. सोबतच डीकेटीईमधील सर्व ब्रँचेसशी संलग्न क्षेत्रांत भारताची चालू असलेली प्रगती व भविष्यातील उद्दीष्टये दर्शवणारी डिजीटल फलक डिझाईन करुन देखावा सुंदर पध्दतीने मांडला आहे. भारतीय युवक व ते करत असलेले वेगवेगळया क्षेत्रातील संशोधन आणि त्यातून होणारी उद्याची राष्ट्रनिर्मिती याचे साक्षात दर्शन होत आहे.
युवाशक्ती ही राष्ट्राची शक्ती या विचाराला केंद्रस्थानी ठेवून साकारलेल्या या गणेश सजावटीत देशाच्या प्रगतीमध्ये युवकांचे योगदान, जबाबदारी आणि भविष्यातील भूमिका प्रभावीपणे आधोरेखित करण्यात आली आहे. शिक्षण, कौशल्य, नवकल्पना, तंत्रज्ञान, उद्योजकता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवा या माध्यमातून सक्षम युवकच विकसित व आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावू शकतात, हा संदेश सजावटीतून देण्यात आला आहे.

सजावटीतील विविध घटकांमधून आजचा युवक घडला तर उद्याचा भारत घडेल हा संदेश प्रभावीपणे मांडला आहे. टेक्स्टाईल विभागातील विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व आकर्षक वस्त्रनिर्मिती, तर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आधुनिक रोबोटीक्सद्वारे उद्योगविश्‍वातील तांत्रिक प्रगतीचा अविष्कार याचे सादरीकरण यावेळीच्या गणेशोत्सावामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी दरबार हॉल मध्ये केलेले आहे.

सदर उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी भेट देवून विद्यार्थ्यांचे व मागदर्शकांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. 

विद्यार्थ्यांस संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील यांचेसह सर्व विभागप्रमुख, सोशल विभागाचे सर्व सदस्य यांचे मागदर्शन लाभले तर विद्यार्थी प्रतिनिधी गौरी हातरकी, प्राजक्ता चव्हाण, प्रणुती शेंडे, समृध्दी लोकरे, आर्यन पाटील, अंशिका शर्मा, तंजीला खान, गायत्री फडके, जहीर नदाफ, हिमेश्‍वरी, तीर्थराज पाटील, नेहा बेरा, श्रावणी वरुटे, श्रावणी वारेकर, इंद्रनील थानेकर, चैतन्य मिरगे, आदित्य जाधव, सुजल विभुते व प्रणव चौगुले यांनी सदर देखावा साकरण्यास परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes