३१ ऑक्टोबरच्या 'एक दिवसीय धरणे आंदोलना'साठी कोल्हापुरातील शिक्षक-कर्मचारी सज्ज; प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात पेन्शन संघटनेचा एल्गार!
schedule27 Oct 26 person by visibility 172 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जिल्हा शाखा कोल्हापूरच्या वतीने येत्या ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी 'काळा दिवस' पाळण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे एका भव्य 'एक दिवसीय धरणे आंदोलना'चे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक आणि कर्मचारी आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारणार आहेत. "आज जर आपण लढलो नाही, तर येणारा भविष्यकाळ आपल्याला कधीही माफ करणार नाही!", असा दृढ निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
◼️प्रमुख मागण्या:
▪️ अशैक्षणिक कामांना विरोध: अशैक्षणिक व ऑनलाईन कामांचा भडिमार थांबवा, आम्हाला शिकवू द्या. वाढत्या ऑनलाईन कामांमुळे शिक्षकांचा मुख्य वेळ शिकवण्याऐवजी माहिती भरण्यात जात आहे.
▪️ जुनी पेन्शन योजना लागू करा: महाराष्ट्रातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करा. दीर्घकाळ सेवा बजावल्यानंतरही कर्मचाऱ्यांना विश्वासाहर्ता असलेली जुनी पेन्शनचा हक्क नाकारला जात आहे.
▪️ 'शिक्षण सेवक' पद रद्द करा: अन्यायकारी 'शिक्षण सेवक' पद कायमस्वरूपी रद्द करा. या पदाच्या नावाखाली होणारे अल्प वेतनावरचे शोषण थांबवणे आवश्यक आहे.
◼️आंदोलनाची वेळ व ठिकाण:
येत्या शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे हे आंदोलन सुरू होईल. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या एकजुटीची ताकत दाखवून द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी केले आहे. प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणांचा विरोध करण्यासाठी आणि आपल्या रास्त मागण्या मान्य करून घेण्यासाठी हे आंदोलन ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, शिक्षक बँकेचे संचालक अमर वरकुटे, राज्यसह कोषाध्यक्ष श्रीनाथ पाटील, विभागीय कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, जिल्हा सरचिटणीस विजय रामाने, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पांढरे, जिल्हा कोषाध्यक्ष निलेश कारंडे, जिल्हा महिलाध्यक्ष आरती पवार, महिला सरचिटणीस संगीता कुडकर, जिल्हा मार्गदर्शक संजय भोसले, बी एल कांबळे, राहुल कांबळे, जिल्हा मीडिया प्रमुख मारुती फातळे, जिल्हा आईटी विभाग प्रमुख सुनिल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ बोराते, संजय पाटील, गजानन कुंभार, अमोल गायकवाड, तालुकाध्यक्ष संतोष जुगळे, प्रमोद पाटील, आनंद पाटील, दिलीप वाळवेकर, संदीप पाटील, विनायक गिरी, बाबुराव कांबळे, अमोल पाटील, बाबुराव निकम, बाळासाहेब सूर्यवंशी, दीपक गायकवाड, व उमेश कुंभार उपस्थित होते.