SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीत‘फ्युचर रेडी इंजिनिअर्स प्रोग्राम २०२६–२७’चे उद्घाटनवारणा उद्योग समूहाकडून शेतकरी, कामगारांची दिवाळी गोड; दिवाळी सणानिमित्त सुमारे १२५ कोटी रुपयांचे वितरणकोल्हापूर महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची विशेष मोहीमविनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी शहरातील 11 आस्थापने सीलकोल्हापूर : अनधिकृत फटाका विक्री केल्यास २ हजार रुपये दंड; फटाका स्टॉलसाठी निश्चित केलेल्या जागेवरच विक्रीस परवानगीगांधीनगर बाजारपेठेत दिवाळीत भारनियमन नको; करवीर शिवसेनेचा महावितरणला इशारा‘केआयटी’त सायबर सुरक्षा विषयात विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे‘गोकुळ’ची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विक्रमी २१ लाख ७० हजार लिटर दूध विक्री!शिरढोण येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीजागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन: महत्त्व आणि जतनाची गरज

जाहिरात

 

विनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी शहरातील 11 आस्थापने सील

schedule27 Oct 26 person by visibility 173 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवणे तसेच भाडेकरारानुसार घरफाळ्याची करआकारणी न केल्याप्रकरणी रविवार पेठ चांदणी चौक व मिरजकर तिकट या परिसरातील आस्थापनांवर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथक, परवाना व विभागीय कार्यालय क्र.२ छत्रपती शिवाजी मार्केट येथील घरफाळा विभागाच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईत 11 आस्थापने सील करण्यात आले. 

या कारवाईमध्ये रविवार पेठ चांदनी चौक येथील शंकर व्हटकर यांच्या मिळकतीतील 4 दुकान गाळयांची घरफाळा थकबाकी पोटी सील करण्यात आले. तर मिरजकर तिकटी येथील ईगल प्राईड व्यापारी संकुलातील 7 विनापरवाना व्यवसाय आस्थापना सील बंद करण्यात आले.

आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे व सहायक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील विनापरवाना व्यावसायिक आस्थापनांना नवीन व्यवसाय परवाना घेण्यासाठी तसेच आवश्यक भाडेकरार सादर करण्यासाठी यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित आस्थापनांनी नोटिसांनंतरही आवश्यक कार्यवाही केली नसल्याने ही कारवाई करण्यात आली.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील घरफाळा थकबाकीदार मिळकतधारक तसेच विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. यापुढेही विनापरवाना व्यवसाय आणि घरफाळा थकबाकीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येणार आहे.
त्यामुळे सर्व मिळकतधारक व व्यावसायिकांनी आवश्यक व्यवसाय परवाना घेऊन तसेच घरफाळ्याची थकीत रक्कम तातडीने भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या कारवाईत परवाना अधीक्षक अशोक यादव, परवाना निरीक्षक संदिप भोई, शिवाजी कोकरे, उपद्रव शोध पथकाचे अशोक साठे, विनोद रुईकर, भोलानाथ पाटणकर तसेच घरफाळा व विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes