SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीत‘फ्युचर रेडी इंजिनिअर्स प्रोग्राम २०२६–२७’चे उद्घाटनवारणा उद्योग समूहाकडून शेतकरी, कामगारांची दिवाळी गोड; दिवाळी सणानिमित्त सुमारे १२५ कोटी रुपयांचे वितरणकोल्हापूर महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची विशेष मोहीमविनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी शहरातील 11 आस्थापने सीलकोल्हापूर : अनधिकृत फटाका विक्री केल्यास २ हजार रुपये दंड; फटाका स्टॉलसाठी निश्चित केलेल्या जागेवरच विक्रीस परवानगीगांधीनगर बाजारपेठेत दिवाळीत भारनियमन नको; करवीर शिवसेनेचा महावितरणला इशारा‘केआयटी’त सायबर सुरक्षा विषयात विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे‘गोकुळ’ची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विक्रमी २१ लाख ७० हजार लिटर दूध विक्री!शिरढोण येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीजागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन: महत्त्व आणि जतनाची गरज

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची विशेष मोहीम

schedule27 Oct 26 person by visibility 192 categoryमहानगरपालिका

◼️२८ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात विशेष शिबिर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत ई-कार्ड (गोल्डन कार्ड) काढण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत महापालिकेच्या मुख्य इमारतीतील स्थायी समिती सभागृहात विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना सूचीबद्ध शासकीय तसेच अंगीकृत रुग्णालयांमध्ये नियमानुसार प्रतिवर्षी प्रति कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य उपचार संरक्षण उपलब्ध आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना आरोग्यविषयक सुविधांचा लाभ घेता येतो. त्यामुळे महापालिकेच्या पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ मिळणार आहे. गोल्डन कार्ड काढण्यासाठी येताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि उपलब्ध असल्यास १२ अंकी आयुष्मान भारत ओळख क्रमांक सोबत आणावा.

महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना या शिबिरामध्ये सहभागी होऊन निर्धारित वेळेत उपस्थित राहून कार्ड काढण्याची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes