SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बालकांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा : सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादवज्युनिअर एशियन हॉकी विजेत्या सानिका माने हिचा सत्कारवन हक्क दावे तातडीने निकाली काढा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर गोकुळ निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार; ८ ऑक्टोबरला माघारीच्या दिवशी पॅनेल जाहीर होणार : मंत्री हसन मुश्रीफमानवतेचे सोने! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कोल्हापूरच्या सफाई दूतांचा आश्किन आजरेकर यांच्या हस्ते गौरवडॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलच्या मुलींचा संघ पाचव्यांदा विजेताभविष्यातील तंत्रज्ञान सहकार्यासाठी केआयटी यु.डब्ल्यू.ए.चा ‘मेजर स्ट्रॅटेजिक पार्टनर’: डॉ.चकमासंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह १ ऑक्टोबरपासून सुरू करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडEMSA INSPIRE 2026 : महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळा २४ सप्टेंबर रोजीआंतरराष्ट्रीय शांतता दिन: महत्त्व आणि आजच्या काळाची गरज

जाहिरात

 

डॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलच्या मुलींचा संघ पाचव्यांदा विजेता

schedule21 Sep 26 person by visibility 123 categoryशैक्षणिक

◼️विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा
◼️अंतिम फेरीत कृषी महाविद्यालय, पुणेचा धुव्वा
 ◼️स्नेहा कोळी ठरली ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’

नवे पारगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलच्या मुलींच्या संघाने आपल्या कौशल्याच्या आणि धडाकेबाज खेळाच्या जोरावर अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात कृषी महाविद्यालय, पुणे संघावर तब्बल २७  विरुद्ध ११ गुणांनी मात करत तळसंदे कृषी  संघाने पाचव्यांदा या स्पर्धेचे  विजेतेपद मिळवले आहे. 

नाशिक येथील संदीप फाउंडेशन कृषी महाविद्यालयात (महिरावणी) १८ व १९ सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा झाली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १० जिल्ह्यांमधून नामांकित १२ महाविद्यालयांच्या संघांनी यात सहभाग नोंदवला होता. सुरुवातीपासूनच डॉ. डी. वाय. पाटील संकुलाच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवत थेट अंतिम फेरीत धडक मारली.

पुणे कृषी महाविद्यालयाविरुद्ध झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात डी. वाय. पाटील कृषीच्या खेळाडूंनी आक्रमक चाली रचत सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. कर्णधार स्नेहा कोळी हिने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत सर्वाधिक १६ पॉईंट्स नोंदवले, तर उपकर्णधार योगिता रणनवरे हिने ६, वैष्णवी हुबाले हिने ४ आणि श्रेया खेडकर हिने १ पॉईंट नोंदवत संघाला २७ पॉईंट्स मिळवत  निर्णायक आघाडी मिळवून दिली. संपूर्ण स्पर्धेत आणि अंतिम सामन्यात केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर स्नेहा कोळी हिला स्पर्धेतील ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’  या बहुमानाने गौरवण्यात आले.

 महात्मा फुले कृषी  विद्यापीठ राहुरीचे माजी अधिष्ठाता डॉ. बी. डी. भाकरे,  विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवरी, संदीप फाउंडेशन कृषी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. 

विजेत्या संघात कर्णधार स्नेहा कोळी, उपकर्णधार योगिता रणनवरे, वैष्णवी हुबाले, श्रेया खेडकर, पायल लोहार, सानिका पाटोळे, सानिका पाटील, सिद्धी पवार, ऋतुजा गायकवाड, दीक्षा कांबळे व प्रणोती पाटील यांचा समावेश होता. या खेळाडूंना शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा. ए. एस. बंद्रे व प्रशिक्षक  वेदांत भानवसे यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंना प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, इन्चार्ज पी. डी. उके, आर. आर. पाटील व विद्यार्थी कल्याण अधिकारी ए. बी. गाताडे यांचे प्रोत्साहन लाभले.

पाचव्यांदा विद्यापीठस्तरीय अजिंक्यपद पटकावल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी  पाटील , विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील , विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षक प्रा. बंद्रे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes