ज्युनिअर एशियन हॉकी विजेत्या सानिका माने हिचा सत्कार
schedule21 Sep 26 person by visibility 107 categoryक्रीडा
कोल्हापूर : ज्युनिअर एशियन हॉकी क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या या जिल्ह्यातील खेडाडू कु. सानिका माने हिचा कोल्हापूर येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चीन येथे झालेल्या ज्युनियर वुमेन्स आशिया कप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान चीनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या सामन्यात सानिका चंद्रकांत माने हिने 17 व्या मिनिटाला केलेला गोल भारताच्या विजयासाठी निर्णायक ठरला .
यावेळी पालकमंत्र्यांनी सानिकाचे कौतुक करत कोल्हापूरची क्रीडा पंढरी म्हणून असलेली गौरवशाली ओळख तिच्या कर्तृत्वामुळे अधिक वृद्धिंगत झाल्याचे प्रतिपादन केले. तसेच सानिकाचे हे धवल यश जिल्ह्यातील युवा व महिला खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून तिच्या या कर्तृत्वातून ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली .
या सत्कार प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड,निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी ,सुहास पाटील उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर, श्रीमती मनीषा पाटील तालुका क्रीडा अधिकारी आदी उपस्थित होते.