SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बालकांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा : सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादवज्युनिअर एशियन हॉकी विजेत्या सानिका माने हिचा सत्कारवन हक्क दावे तातडीने निकाली काढा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर गोकुळ निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार; ८ ऑक्टोबरला माघारीच्या दिवशी पॅनेल जाहीर होणार : मंत्री हसन मुश्रीफमानवतेचे सोने! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कोल्हापूरच्या सफाई दूतांचा आश्किन आजरेकर यांच्या हस्ते गौरवडॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलच्या मुलींचा संघ पाचव्यांदा विजेताभविष्यातील तंत्रज्ञान सहकार्यासाठी केआयटी यु.डब्ल्यू.ए.चा ‘मेजर स्ट्रॅटेजिक पार्टनर’: डॉ.चकमासंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह १ ऑक्टोबरपासून सुरू करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडEMSA INSPIRE 2026 : महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळा २४ सप्टेंबर रोजीआंतरराष्ट्रीय शांतता दिन: महत्त्व आणि आजच्या काळाची गरज

जाहिरात

 

भविष्यातील तंत्रज्ञान सहकार्यासाठी केआयटी यु.डब्ल्यू.ए.चा ‘मेजर स्ट्रॅटेजिक पार्टनर’: डॉ.चकमा

schedule21 Sep 26 person by visibility 149 categoryशैक्षणिक

◼️युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यु.डब्ल्यू.ए.) चे कुलगुरू डॉ. अमित चकमा यांचे मनोगत

कोल्हापूर  : कोल्हापूरच्या केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय (प्रदत्त स्वायत्त) आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) यांच्यातील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याबाबत आज महत्त्वपूर्ण आणि दूरगामी चर्चा झाली. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे कुलगुरू डॉ. अमित चकमा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देत संस्थेच्या शैक्षणिक, संशोधनात्मक, तांत्रिक व नवोपक्रमात्मक उपक्रमांची माहिती घेतली.

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे कुलगुरू डॉ. अमित चकमा यांनी केआयटीच्या उपक्रमांचे कौतुक करताना, “केआयटी आणि यु.डब्ल्यू.ए. यांच्यातील औद्योगिक अभिमुखता तसेच सांस्कृतिक व वैचारिक साम्यामुळे हे सहकार्य विशेष महत्त्वाचे आहे. भविष्यातील तंत्रज्ञान विकासासाठी केआयटीला एक प्रमुख धोरणात्मक भागीदार म्हणून विकसित करण्यास आम्हाला स्वारस्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी अशा संस्थात्मक भागीदारीचा महत्त्वपूर्ण योगदानात्मक दुवा म्हणून उपयोग होऊ शकतो, असेही डॉ. चकमा यांनी नमूद केले. 

विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी, संयुक्त संशोधन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभव मिळवून देण्यासाठी भविष्यात व्यापक सहकार्य करण्याची भूमिका संस्थेचे अध्यक्ष श्री. साजिद हुदली त्यांनी व्यक्त केली. केआयटीमध्ये प्रस्तावित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन इमर्जिंग टेक्नॉलॉजी’ हे केवळ प्रशिक्षण केंद्र न राहता विद्यार्थ्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय संशोधन, उद्योगाभिमुख कौशल्ये आणि जागतिक तज्ज्ञांशी संवाद यांची संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ ठरणार आहे. भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्राच्या गरजा ओळखून उद्योगसिद्ध आणि जागतिक स्तरावर सक्षम अभियंते घडविण्याच्या केआयटीच्या प्रयत्नांना या सहकार्यामुळे नवी गती मिळणार आहे.

डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केआयटीची शैक्षणिक वाटचाल, संशोधन, नवोपक्रम, उद्योग-सहकार्य, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि भविष्यातील विकास आराखड्याची माहिती दिली.केआयटीच्या आंतरराष्ट्रीय भागीदारीचा विस्तार भारतापुरता मर्यादित न राहता युरोप आणि ऑस्ट्रेलियापर्यंत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

केआयटीचे आंतरराष्ट्रीय संबंध अधिष्ठाता डॉ. रोहन नलवडे यांनी सांगितले की, कोल्हापूरमधील एखाद्या शैक्षणिक संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या कुलगुरूंची झालेली ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण असून, या माध्यमातून केआयटी आणि यु.डब्ल्यू.ए. यांच्यातील शैक्षणिक, संशोधनात्मक आणि तंत्रज्ञानाधारित सहकार्याला व्यापक दिशा मिळणार आहे.

या बैठकीस संस्थेचे सचिव श्री. दीपक चौगुले, आंतरराष्ट्रीय संबंध अधिष्ठाता डॉ. रोहन नलावडे, तसेच सौ. मीना चकमा, श्री. प्रणव देसाई – प्रकल्प अधिकारी, यु.डब्लू.ए. आणि डॉ. कलिथा चेरीयन – वरिष्ठ व्यवस्थापक, शैक्षणिक भागीदारी यु.डब्लू.ए. यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes