संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन
schedule26 Feb 26 person by visibility 104 categoryशैक्षणिक
कोल्हापूर :अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये “इनो क्वेस्ट २के२६” नाविन्यपूर्ण कल्पना, प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन सोमवार, २ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. संस्थेच्या ‘संस्थात्मक नवोपक्रम परिषदे’च्या (आयआयसी) पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आपले अभिनव प्रकल्प आणि कल्पना सादर करणार आहेत. उद्योगाभिमुख विचारसरणी, नवउद्योजकता संस्कृती आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी सांगितले.
स्पर्धांमध्ये ‘इनोव्हाट्रिक्स’, ‘आयडीया पिचिंग स्पर्धा’, ‘टेक्नोव्हर्स टेक-पेस्ट’, ‘पोस्टर एक्स प्रो’ आणि ‘टेक रोबस्टा’ या प्रमुख विभागांचा समावेश आहे. ‘इनोव्हाट्रिक्स’ अंतर्गत ‘सर्किट्रिक्स’ आणि ‘इनोव्हेटर्स अरेना’ होणार असून, एक किंवा दोन सदस्यांच्या गटांना सहभाग घेता येणार आहे.
‘आयडीया पिचिंग’ स्पर्धेत समस्या मांडणी, प्रस्तावित उपाययोजना, लक्ष्यित बाजारपेठ, उत्पन्न मॉडेल तसेच नाविन्य आणि विस्तारक्षमता यांचा समावेश असलेले सादरीकरण अपेक्षित आहे. या स्पर्धेत कमाल चार सदस्यांच्या गटांना सहभाग देता येणार आहे.
‘‘टेक्नोव्हर्स टेक-पेस्ट’ अंतर्गत ग्रँड प्रिक्स ऑफ कोड, ब्लाइंड कोडिंग अरेना, पिक्सेल फिक्स, स्क्विड हंट, ई-स्पोर्ट्स (बीएमआय), ई-स्पोर्ट्स (फ्री फायर) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘पोस्टर एक्स प्रो’ मध्ये सस्टनेबल अँड ग्रीन कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्री 4.0 अँड ऑटोमेशन, 5जी कमुनिकेशन सिस्टीम, वायरलेस कम्युनिकेशन: फ्युचर नेटवर्क आर्किटेक्चर, आर्टिफिशियल इंटीजिलेन्स आणि स्मार्ट सिटी या विषयांवर सादरीकरण होणार आहे. ‘टेक रोबस्टा’ अंतर्गत वळणदार मार्ग, गतीरोधक, बोगदे आणि उतार असलेल्या मार्गावर यंत्रमानव शर्यत आयोजित करण्यात आली असून, दोन सदस्यांच्या गटांना सहभाग घेता येणार आहे.
प्रत्येक स्पर्धेसाठी प्रति सहभागी नाममात्र प्रवेश शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. विजेत्यांना प्रायोजकाकडून आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संबंधित विद्यार्थी समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.