कोल्हापूर : पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 64 कनेक्शन व 33 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई
schedule26 Feb 26 person by visibility 246 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाकडील वितरण शाखा व पाणीपट्टी शाखा यांच्यामार्फत थकबाकी व अनाधिकृत कनेक्शन धारकांवर संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनधिकृत नळ कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.
यामध्ये दि. 23 ते 26 फेब्रुवारी 2026 अखेर थकबाकी असलेली 64 कनेकशन व 33 अनाधिकृत कनेक्शन खंडीत करुन रोख रक्कम रुपये 5 लाख 61 हजार 420/- इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली. तसेच चेकद्वारे रक्कम 10 लाख 42 हजार 263 इतकी रक्कम वसूल करुन रक्कम रु.16 लाख 03 हजार 683/- इतकी रक्कम जमा झाली आहे. सदरची कारवाई शहरातील लक्षतीर्थ वसाहत, चंबुखडी, शिगंणापुर, मांतग वसाहत, झोपडपट्टी एरिया, भगतसिंग वसाहत, राजारामपुरी 7, 8 व 9 वी गल्लीमध्ये, झोपडपटटी एरिया, गंगावेश, दत्तगल्ली, पाडळकर मार्केट परिसर, लक्ष्मीपुरी, जय शिवराय चौक, श्रेयश पार्क, गजानन महाराजनगर, कावळा नाका परिसर, संजय गांधी सोसायटी, गोल्डस जिम, ताराबाई पार्क इत्यादी भागामध्ये कारवाई करुन कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई आयुक्त के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ व जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये शाखा अभियंता राजेंद्र हुजरे, मयुरी पटवेगार, प्रिया पाटील, महानंदा सुर्यवंशी, सुनिल भाईक, पथक प्रमुख अजित मोहिते, मधु कदम, अमर बागल, संजय पाटील यांनी केली आहे.
सदरची मोहिम येथून पुढेही सुरु राहणार असून पाणी बिलाची थकीत रक्कम वेळेवर भरणा करावी व नळ कनेक्शन बंद करणे, वर्तमानपत्रात नाव प्रसिध्द करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.