SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजाराम तलावाजवळील थरारक जबरी चोरी २४ तासांच्या आत उघड! ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगतगोकुळ दूध संघ जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांचा राहावा : आमदार सतेज पाटीलतारदाळ येथे वाहनांच्या फिटनेस तपासणीची सुविधा सुरू : आमदार यड्रावकर डीएसओ बुद्धिबळ निवड स्पर्धेत केन चेस अकॅडमीचा ऐतिहासिक यश; १५ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवडडी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअपश्री शाहू सह. दूध व्यव. संस्था मर्या. नागांवची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; उत्कृष्ट दूध उत्पादकांचा गौरव!कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला 'खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा'; रोख बक्षीसांसह ४१ आकर्षक पारितोषिके जिंकण्याची सुवर्णसंधी!दुष्काळाच्या छायेत संवेदनशील निर्णय! भागीरथी संस्थेची 'झिम्मा फुगडी' स्पर्धा रद्द; बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार“स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पाहा!” प्राध्यापक नितीन बानगुडे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेशशामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावोगावी मोफत आरोग्य शिबिरे

जाहिरात

 

कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला 'खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा'; रोख बक्षीसांसह ४१ आकर्षक पारितोषिके जिंकण्याची सुवर्णसंधी!

schedule30 Sep 26 person by visibility 285 categoryक्रीडा

कोल्हापूर : बुद्धिबळप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून अनुज् ॲकॅडमीच्या वतीने आणि कै. दत्तात्रय विठ्ठल जोशी यांच्या स्मरणार्थ रविवारी, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात एका ‘खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. बापूराम नगर येथील बापूसो साळोखे हॉलमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील बुद्धिबळपटूंना आपल्या बौद्धिक कौशल्याची चुणूक दाखवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

स्पर्धेचे स्वरूप अत्यंत आकर्षक ठेवण्यात आले असून, यामध्ये तब्बल ४१ बक्षिसांची लयलूट करता येणार आहे. यात रोख रकमेसह १६ भव्य चषक आणि १३ पदकांचा समावेश आहे. विशेषतः प्रथम क्रमांकासाठी २,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १,५०० रुपये, तृतीय क्रमांकासाठी १,००० रुपये, चौथ्या क्रमांकासाठी ५०० रुपये आणि पाचव्या क्रमांकासाठी ४०० रुपये अशी रोख बक्षिसे दिली जाणार असून, रोख रकमेचे एकूण मूल्य १०,००० रुपयांपेक्षा अधिक आहे. मुख्य गटासोबतच विविध वयोगटातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष रोख बक्षिसे, चषक व पदके देखील ठेवली आहेत.
या स्पर्धेची तांत्रिक बाजू आणि चीप पंच  म्हणून शैलेश होनकट्टी जबाबदारी पार पाडणार आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी ३ ऑक्टोबरपर्यंत आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

तसेच, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता सर्व सहभागी खेळाडूंनी बापूराम नगरमधील बापूसो साळोखे हॉल येथे उपस्थित राहणे बंधनकारक आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन संयोजक बाबूराव पाटील, अनुष्का पाटील आणि कृष्णात पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes