SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजाराम तलावाजवळील थरारक जबरी चोरी २४ तासांच्या आत उघड! ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगतगोकुळ दूध संघ जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांचा राहावा : आमदार सतेज पाटीलतारदाळ येथे वाहनांच्या फिटनेस तपासणीची सुविधा सुरू : आमदार यड्रावकर डीएसओ बुद्धिबळ निवड स्पर्धेत केन चेस अकॅडमीचा ऐतिहासिक यश; १५ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवडडी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअपश्री शाहू सह. दूध व्यव. संस्था मर्या. नागांवची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; उत्कृष्ट दूध उत्पादकांचा गौरव!कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला 'खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा'; रोख बक्षीसांसह ४१ आकर्षक पारितोषिके जिंकण्याची सुवर्णसंधी!दुष्काळाच्या छायेत संवेदनशील निर्णय! भागीरथी संस्थेची 'झिम्मा फुगडी' स्पर्धा रद्द; बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार“स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पाहा!” प्राध्यापक नितीन बानगुडे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेशशामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावोगावी मोफत आरोग्य शिबिरे

जाहिरात

 

“स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पाहा!” प्राध्यापक नितीन बानगुडे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

schedule30 Sep 26 person by visibility 149 categoryशैक्षणिक

◼️संजय घोडावत शैक्षणिक संकुलात व्यवसाय व उद्योग विकास मंचाचा संवाद यशाचा’ प्रेरणादायी उपक्रम

कोल्हापूर : संजय घोडावत शैक्षणिक संकुलन आणि व्यवसाय व उद्योग विकास मंचाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘संवाद यशाचा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत यश, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर निवड आणि संकटांवर मात करण्याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले.

 या कार्यक्रमास व्यवसाय व उद्योग विकास मंचाचे संचालक महेश सारडा, राजेश शहा, अरुण शहा, युवराज शहा, निकुंज, अमित माटे, सचिव तथा संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांची उपस्थिती होती. शैक्षणिक संकुलातील मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व्यवसाय व उद्योग विकास मंचाचे सचिव तथा संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी प्रास्ताविक केले. शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा, विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी व आव्हानांची माहिती मिळावी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योगाभिमुख दृष्टिकोन विकसित करावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, संजय घोडावत नाम ही काफी है “आपण स्वतः किती उंचीवर पोहोचलो याला फारशी किंमत नाही; आपण किती लोकांना त्या उंचीपर्यंत पोहोचवले, हीच खरी उंची आहे.” संजय घोडावत यांचे  स्वतःच्या यशासोबत इतरांच्या प्रगतीत योगदान देणे हेच जीवनातील खरे यश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मानवी व्यक्तिमत्त्वातील क्षमतांवर भाष्य करताना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःला ‘मला आयुष्यात काय बनायचे आहे?’ हा प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे करण्याची क्षमता असते. डॉक्टर, अभियंता, वकील, क्रिकेटपटू, अभिनेता, शास्त्रज्ञ किंवा उद्योजक होण्याची स्वप्ने पाहताना स्वतःची आवड, क्षमता आणि कौशल्ये ओळखणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

मनाची शक्ती आणि आत्मविश्वासाचे महत्त्व स्पष्ट करताना प्रा. बानगुडे पाटील यांनी भगवान महावीरांच्या जीवनाचा संदर्भ दिला. “जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो महावीर,” या विचारातून त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविजयाचा संदेश दिला. बाह्य परिस्थितीपेक्षा आपल्या मनातील विचार आणि आत्मविश्वास आपले यश निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे त्यांनी नमूद केले.

“आपल्या अपयशातील पहिली भीती मनातून काढून टाका. स्वतःच्या क्षमता ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. जगात इतर कोणीही आपल्यावर मर्यादा घालण्यापूर्वी आपणच स्वतःवर मर्यादा घालतो. त्यामुळे न्यूनगंड, भीती आणि अपयशाची चिंता बाजूला ठेवून ध्येयाकडे वाटचाल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

करिअर निवडताना इतरांचे अनुकरण न करता स्वतःची आवड, क्षमता, कौशल्ये आणि भविष्यातील ध्येय यांचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच संकटांकडे अडथळे म्हणून न पाहता ती आपल्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढविणारी संधी मानावी. “आपल्या कमतरतांना आपली बलस्थाने बनवा,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, जिद्द आणि सकारात्मक विचारांची ताकद समजावून सांगितली.

शून्यापासून सुरुवात करून मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या यशासोबत इतरांनाही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा, असा प्रेरणादायी संदेश प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सोहन तिवडे यांनी केले तर महेश सारडा यांनी आभार मानले.  कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी उभे राहून टाळ्याच्या गजरात प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes