श्री शाहू सह. दूध व्यव. संस्था मर्या. नागांवची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; उत्कृष्ट दूध उत्पादकांचा गौरव!
schedule30 Sep 26 person by visibility 311 category
कोल्हापूर : नागांव, (ता. करवीर) येथील श्री शाहू सहकारी दूध व्यवहारा संस्था मर्यादित, नागांव (ता. करवीर) या संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात पार पडली
या सर्वसाधारण सभेत दूध उत्पादक स्पर्धा २०२५-२०२६ मधील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. ज्या सभासदांनी उत्कृष्ट दूध गुणवत्ता, उच्च संकलन आणि आदर्श गोठा व्यवस्थापन ठेवून यश संपादन केले, अशा जास्तीत जास्त गाय व म्हैस दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक सभासदांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
सभेमध्ये संस्थेचे चेअरमन बी. के. संकपाळ यांनी उपस्थित सभासदांना मोलाचे मार्गदर्शन केले. आभार निवास तोरस्कर यांनी मानले.
🟧 दूध उत्पादक स्पर्धा २०२५-२०२६ चे विजेते:
१. गाय दूध उत्पादन वर्ग:
▪️ प्रथम क्रमांक: लता मारुती तेली
▪️ द्वितीय क्रमांक: संगीता उत्तम मगदूम
▪️ तृतीय क्रमांक: राजाराम दिनकर कोराणे
२. म्हैस दूध उत्पादन वर्ग:
▪️ प्रथम क्रमांक: विलास महादेव कोराणे
▪️ द्वितीय क्रमांक: रावसो दादू पाटील
▪️ तृतीय क्रमांक: शशिकांत चंदर कोराणे
उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या सर्व विजेत्या दूध उत्पादक सभासदांचे शाहू दूध संस्था नागांवचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, सचिव, कर्मचारी व सर्व सभासदांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी चेअरमन बाळासो कृष्णा संकपाळ, व्हा. चेअरमन संजय धोंडीराम कराडे, आणि सदस्य आनंदा गणपती पवार, भिमराव पांढुरंग मगदूम, उत्तम मारुती मगदूम, भिमराव भाऊ पोवार, राजगोंडा दगडू पाटील, राजाराम दिनकर कोराणे, कृष्णात बापू रानगे, सदस्या जनाबाई दत्तात्रय तोरस्कर व श्रीमती सुशिला जिनगोंडा पाटील या सदस्यांसह मारुती शिवा तेली, संदिप पाटील, प्रमोद अतिग्रे, इंद्रजीत मगदूम, शशीकांत कोराणे आदी मान्यवर उपस्थित होते
तसेच सेवक वर्गामध्ये संजय गणपती पवार (मानद सचिव), वसंत गणपती कोराणे (सचिव), राजाराम ज्ञानदेव कांबळे (क्लार्क/मापाडी), सुरज बाळासो काडर मापाडी व संस्थेचे सभासद शेतकरी उपस्थित होते.