SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालायला हव्यात, मोडून काढणे योग्य नव्हे : आमदार सतेज पाटील श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा जाहीर सत्कार!विकसित भारत युवा संवाद कार्यक्रम : प्रशिक्षणार्थींना लोकशाही मुल्यं, मतदान जनजागृती आणि जबाबदार नागरिकत्वाबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून मार्गदर्शनगोकुळमध्ये दूध उत्पादकांच्या कौलाचा अनादर; लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा - आमदार सतेज पाटील यांची सादकेंद्रात, राज्यात सत्ता असल्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल : खासदार धनंजय महाडिककागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; मंत्री हसन मुश्रीफ यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आग्रही मागणीराष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, पालकांनी सहकार्य करावे : आरोग्याधिकारी प्रकाश पावरास्वच्छता मोहिमेत 20 टण प्लॅस्टिक, तणकट व खरमाती उठाववारणा दूध संघामार्फत तात्यासाहेब कोरे यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त ६ नोव्हेंबरला जातिवंत जनावरांचे भव्य प्रदर्शन चिपको आंदोलनाच्या खऱ्या सहचारिणी : विमला बहुगुणा

जाहिरात

 

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध

schedule13 Aug 25 person by visibility 951 categoryमनोरंजन

मुंबई  : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025 पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून  1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे श्री.चवरे यांनी नमूद केले आहे.    

22 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर, 2025 पासून विविध 10 केंद्रांवर तर 64 व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिमफेरी प्रत्येकी एका केंद्रावर डिसेंबर, 2025 पासून आयोजित करण्यात येणार आहे.
       
नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका 31 ऑगस्ट, 2025 पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात.    

विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही.

स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.

राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. चवरे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes