SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कुडीत्रे येथे ‘तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा’ उत्साहात संपन्नकोल्हापूर जिल्हास्तरीय धान्य महोत्सवास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसादसोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे!कोल्हापूर एलसीबीची मध्यप्रदेशात मोठी कारवाई; ४ पिस्तुलं जप्त, कुख्यात शस्त्र तस्कर जेरबंदकोल्हापुरात ‘मिलेट रॅली’द्वारे पौष्टिक तृणधान्यांचा जागरडोक्यावरचा हंडा काढा; पाणीपुरवठ्याचे नियोजन करा!बिहार दिन: भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचा हुंकारघोडावत गुळ प्रकल्पाचे धुराडे कोसळलेडी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा 'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथमरमजान ईद व गुढीपाडवा निमित्त ‘गोकुळ’ च्या दुधाची विक्रमी विक्री

जाहिरात

 

कोल्हापूर एलसीबीची मध्यप्रदेशात मोठी कारवाई; ४ पिस्तुलं जप्त, कुख्यात शस्त्र तस्कर जेरबंद

schedule22 Mar 26 person by visibility 206 categoryगुन्हे

कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे धाडसी कारवाई करत २ लाख रुपये किमतीची ४ देशी बनावटीची पिस्तुलं जप्त केली आहेत. याप्रकरणी आंतरराज्य शस्त्र तस्कर सरनाम नाहरसिंह बरनाला (वय २८, रा. सिगनूर, जि. खरगुण, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २४ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आर्म्स ॲक्ट आणि एनडीपीएस गुन्ह्याचा तपास करत असताना, अटक केलेला मुख्य आरोपी मनिष नागोरी याने जिवंत काडतुसे मध्यप्रदेशातील सरनाम नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याची कबुली दिली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सागर वाघ आणि उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या दोन पथकांनी मध्यप्रदेशात तळ ठोकला होता.

१५ मार्च रोजी बुऱ्हाणपूर येथील सम्राट मौर्य हॉटेल परिसरात सापळा रचला असता, आरोपी सरनाम दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाला, मात्र घाईघाईत त्याने टाकलेल्या पिशवीत ४ पिस्तुलं मिळून आली. जिद्दीने पाठलाग सुरू ठेवून अखेर २० मार्च रोजी बिस्तान पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली. गेल्या १० दिवसांपासून बुऱ्हाणपूर, खरगुण आणि गोगावा परिसरात पोलीस पथक शोध घेत होते. ही धडाकेबाज कामगिरी एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सागर वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फत्ते केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes