SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कुडीत्रे येथे ‘तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा’ उत्साहात संपन्नकोल्हापूर जिल्हास्तरीय धान्य महोत्सवास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसादसोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे!कोल्हापूर एलसीबीची मध्यप्रदेशात मोठी कारवाई; ४ पिस्तुलं जप्त, कुख्यात शस्त्र तस्कर जेरबंदकोल्हापुरात ‘मिलेट रॅली’द्वारे पौष्टिक तृणधान्यांचा जागरडोक्यावरचा हंडा काढा; पाणीपुरवठ्याचे नियोजन करा!बिहार दिन: भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचा हुंकारघोडावत गुळ प्रकल्पाचे धुराडे कोसळलेडी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा 'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथमरमजान ईद व गुढीपाडवा निमित्त ‘गोकुळ’ च्या दुधाची विक्रमी विक्री

जाहिरात

 

सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे!

schedule22 Mar 26 person by visibility 106 categoryराज्य

▪️इथिकल लीडरशीप’च्या कार्याची दखल

मुंबई : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रभावी नेतृत्वाची दखल घेत सुप्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘सोसायटी अचिव्हर्स’ यांनी त्यांच्या विशेष मुलाखतीसह त्यांना कव्हर पेजवर स्थान दिले आहे. “देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर इथिकल लीडरशीप” या शब्दांत त्यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासाचा गौरव करण्यात आला आहे.

मॅगझिनची स्पेशल एडिशन यंदा प्रकाशित झाली असून देश–विदेशातील मोठ्या वाचकवर्गात ती पोहोचली आहे. अभ्यासू, धडाडीच्या आणि लोकाभिमुख निर्णय घेणाऱ्या नेत्या म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन या विभागांत मंत्री म्हणून काम करताना त्यांनी घेतलेल्या पुढाकारांचा आढावा या मुलाखतीत मांडण्यात आला आहे.

मॅगझिनच्या संपादिका अँड्रिया कोस्टबीर यांनी ही विशेष मुलाखत घेतली असून मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यप्रवासातील विविध टप्पे व पैलू आकर्षक छायाचित्रांसह सादर करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतीही या अंकात समाविष्ट आहेत.

▪️स्पेशल एडिशनचे प्रकाशन रामटेक निवासस्थानी
शनिवारी संपादिका अँड्रिया कोस्टबीर आणि अशोक धामणकर यांनी रामटेक येथील शासकीय निवासस्थानी भेट देऊन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या स्पेशल एडिशनचे प्रकाशन केले. यानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “सोसायटी अचिव्हर्स मॅगझिनने त्यांच्या कव्हर स्टोरीमध्ये मला स्थान दिल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते. माझ्या प्रवासाची झलक या अंकातून वाचकांसमोर येत आहे, ती नक्की वाचा,” असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes