SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक : महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेतरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटीलनैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्वाचे : उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांचे प्रतिपादन; कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण संपन्न कोल्हापूर : नगररचना विभागामार्फत एक दिवसाचा विशेष कॅम्पकोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयातील आर्थोपेडिक ऑपरेशन थिएटर व जनरल ऑपरेशन थिएटर पाच दिवस बंदनवीन कृषी पंपाना कनेक्शन, कमी दरात वीज, वीज दरवाढ रद्द करुन प्रस्ताव मागे घेण्याबाबत आमदार सतेज पाटील यांचे विधानपरिषदेत प्रश्नकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा ३३ वा हंगाम समाप्त"व्यवसायाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उद्योगशिक्षण या क्षेत्रांचा सुसंवाद आवश्यक"ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - डॉ.राजन गवसडॉ.म.सु.पाटील वैश्विक दृष्टिकोन अंगीकारलेले समीक्षक : प्राचार्य डॉ.दिलीप धोंगडे

जाहिरात

 

"ए एस ट्रेडर्सचा 'TRADEWINGS' घोटाळाः फरार संचालक संतोष कुंभारच्या मुसक्या आवळल्या; कोल्हापूर पोलिसांचा मास्टरस्ट्रोक !"

schedule25 Feb 26 person by visibility 856 categoryगुन्हे

कोल्हापूर  : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून मागील ३ वर्षे २ महिने २७ दिवसांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या 'ए एस ट्रेडर्स' घोटाळ्यातील फरार संचालकाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संतोष नंदकुमार कुंभार (वय ४१, रा. दत्तनगर, पलुस) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने  सांगली जिल्ह्यातील पलुस येथून त्याला थरारक पाठलाग करून ताब्यात घेतले.


'ए एस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स LLP' आणि तिची उपकंपनी 'TRADEWINGS SOLUTIONS LIMITED' च्या संचालकांनी गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून हजारो गोरगरीब गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. पैसे हडप केल्यानंतर कार्यालये बंद करून हे संचालक पसार झाले होते. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.


पोलीस अधीक्षक  योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष चक्रावले फिरवले होते. तांत्रिक तपासाच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सापळा रचून कुंभारला जेरबंद केले.

 या महाघोटाळ्यात आतापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, अजूनही १६ आरोपी फरार आहेत.

"गुंतवणूकदारांच्या कष्टाचा पैसा हडप करणाऱ्या एकाही आरोपीला सोडले जाणार नाही," असा कडक इशारा या कारवाईनंतर प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या कारवाईत पीएसआय जालिंदर जाधव, युवराज पाटील, अमित सर्जे आणि राजू येडगे यांनी मोलाची भूमिका बजावली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes