SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोधटाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवडनगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूरसकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. ज्ञानवत्सल स्वामी; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; ७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान ‘डिपेक्स’मध्ये केआयटी प्रथम राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिकथकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सीलसेवा रुग्णालयात गुरुवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजनशिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

जाहिरात

 

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

schedule11 Mar 26 person by visibility 99 categoryराज्य

▪️ नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची आढावा बैठक

मुंबई : नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांचा जलसंपदा (विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. कोट्यवधी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार असल्याने सर्व सुविधा नियोजनबद्ध, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, भूमी अभिलेख उपसंचालक, निफाड व नाशिकचे उपविभागीय दंडाधिकारी, बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे भव्य प्रतीक आहे. देशभरातून तसेच जगभरातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना उत्तम सुविधा मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. यावेळी नाशिक चक्राकार रस्ता, त्र्यंबक डीपी रोड, त्र्यंबक दर्शन पथ, द्वारका सर्कल परिसराचा विकास, ओझर विमानतळाशी संबंधित सुविधा, घोटीवाले रोड, कर्मचारी वसाहत, घाट बांधकाम तसेच विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन, जमीन मोजणी आदी कामांचा सविस्तर आढावा मंत्री महाजन यांनी घेतला.

कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था आणि सुरक्षितता यांचा विचार करून सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी करावी. कामे वेळेत पूर्ण होणे जितके आवश्यक आहे, तितकेच ती दर्जेदार आणि टिकाऊ असणेही महत्त्वाचे आहे.

कुंभमेळ्याच्या भव्यदिव्य आयोजनासाठी सर्व विभागानी आपआपसात समन्वय ठेवून, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरेल, अशा पद्धतीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मंत्री महाजन यांनी यावेळी दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes