SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोधटाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवडनगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूरसकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. ज्ञानवत्सल स्वामी; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; ७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान ‘डिपेक्स’मध्ये केआयटी प्रथम राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिकथकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सीलसेवा रुग्णालयात गुरुवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजनशिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

जाहिरात

 

थकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सील

schedule11 Mar 26 person by visibility 119 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका मालकीचे भाडे तत्वावर दिलेले ए वॉर्डमधील कपिलतीर्थ मार्केट येथील दुकानगाळे भाडे थकवणाऱ्या भाडेकरूंवर इस्टेट विभागाने मंगळवार दि. 10 मार्च 2026 रोजी वसुली मोहिम राबवत कारवाई केली.  मागील थकबाकी तसेच सन 2025-26 या आर्थिक वर्षातील महापालिकेच्या दुकानभाडे भरण्याबाबत संबंधित भाडेकरूंना सूचना देण्यात आल्या. थकबाकी  न भरल्याने कपिलतीर्थ मार्केटमधील पाच दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सील करण्यात आले.

   सील करण्यात आलेल्या गाळ्यांमध्ये सलीम बालेचाँद मणेर, अर्जुन अरुण कोळेकर, अरुण सखाराम जाधव, नितीन एकनाथ चेणे तसेच चेअरमन प्रयाग चिखली सहकारी दुधसंस्था यांच्या दुकानांचा समावेश आहे.

   यापुढेही थकबाकीदारांवर अशीच कारवाई करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार दुकानगाळे सील करणे तसेच संबंधित मिळकतींवर बोजा नोंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल. महापालिकेच्या मालकीच्या दुकानांचे भाडेकरूंनी आपली थकबाकी तातडीने भरावी, असे आवाहन इस्टेट विभागाकडून करण्यात आले आहे.

  ही कारवाई अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त किरण धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे तसेच गणेश भोसले, अरुण भोसले, जर्नादन भालकर, रविंद्र कांबळे, अविष्कार भोजे, कल्पना शिरदवाडे, सदानंद फाळके, संजय साळोखे, विक्रम पोवार, सुशांत कवाळे आणि प्रथमेश पोवार यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes