SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्यदूत प्रशांत साळुंखे यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त पती-पत्नीचा वाचला जीव!​भिमा हेल्थ झोनच्या विस्तारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे १० कोटींचा प्रस्ताव; कृष्णराज महाडिकांच्या प्रयत्नांना वेग.जयसिंगपुरात राजर्षी शाहू महाराज व श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरणगृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन 'हीच खरी शिवसेना', कोल्हापुरातील सभेतून अमित शाहांचे मोठे विधानडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकला भारत सरकारकडून पेटंट१४४५.९७ कोटींच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ'हा देश म्हणजे धर्मशाला नाही!' कोल्हापूरच्या भूमीतून अमित शाह यांचा विरोधकांवर एल्गारजागतिक शरणार्थी दिन: माणुसकीच्या नात्याने संघर्षाला सलामकेंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन व स्वागत

जाहिरात

 

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

schedule11 Mar 26 person by visibility 429 categoryदेश

नवी दिल्ली :  सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला जोडणार्‍या विविध महामार्गांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, अशी मागणी केली. त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत सकारात्मक प्रतिसाद देवून, या प्रकल्पांबद्दल सविस्तर माहिती दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक मोठ्या प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. कागल ते सातारा सहा लेन कॉंक्रीट रस्त्यासाठी २ हजार १६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर कोल्हापूर ते रत्नागिरी चार लेन कॉंक्रीट रस्त्यासाठी ५ हजार १९२ कोटी रुपये आणि कोल्हापूर ते सांगली चौपदरी रस्त्यासाठी १ हजार १९२ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी आज संसदेच्या अधिवेशनात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धन्यवाद दिले.

 शिरोली जवळचा सांगली फाटयापासून उंचगावपर्यंत पिलरवरील उड्डाण पुल उभारला जाणार आहे. सुमारे ३.६ किलोमीटर लांबीचा हा उड्डाण पुल आणि त्याला जोडूनच कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी होणारा बास्केट ब्रिज पुर्ण झाल्यानंतर, महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल. मात्र तावडे हॉटेल ते कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल होण्यासाठी गतीमान हालचाली व्हाव्यात, हा उड्डाण पुल पन्हाळा रोडवरील कोतोलीपर्यंत न्यावा, तर शहरातील उड्डाण पुलाची एक बाजू फुलेवाडीपर्यंत वाढवावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. त्याबद्दल केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी सविस्तर माहिती दिली. कोल्हापूर महापालिकेने युटिलिटी शिफ्टिंग आणि जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण केली, तर केंद्र सरकारकडून शहरातील उड्डाण पुलाचे काम करण्यासाठी पूर्ण सहकार्य असेल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. 

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत रस्ते विकासासाठी सुमारे २५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर झाला असून, अनेक महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत किंवा पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. शिरोली ते उचगाव दरम्यानच्या उड्डाण पुलासाठी ९१३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर कागल शहराजवळ ३५८ कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला मंजुरी दिल्याचे नामदार गडकरी यांनी स्पष्ट केले. खासदार महाडिक यांनी पिलरवरील उड्डाण पुल, बास्केट ब्रिज या बरोबर आता कोल्हापूर शहरातील उड्डाण पुलासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

🟠 नामदार नितीन गडकरी यांनी संसदेत बोलताना कोल्हापुरबद्दल विशेष गौरवोद्गार काढले. सहकार, कृषी, उद्योग, पर्यटन विश्‍वात कोल्हापूर अग्रेसर असून, दरडोई उत्पन्नातही कोल्हापूर देशात आघाडीवर असल्याचे नामदार गडकरी यांनी बोलून दाखवले. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने बास्केट ब्रीजसाठी पाठपुरावा केला. त्यांनी बनवून घेतलेले बास्केट ब्रीजचे डिझाईन सर्वोत्तम असल्याने, रस्ते विकास महामंडळाने तेच डिझाईन स्विकारले, असे नामदार गडकरी यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes