SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोधटाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवडनगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूरसकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. ज्ञानवत्सल स्वामी; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; ७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान ‘डिपेक्स’मध्ये केआयटी प्रथम राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिकथकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सीलसेवा रुग्णालयात गुरुवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजनशिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

जाहिरात

 

‘डिपेक्स’मध्ये केआयटी प्रथम राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिक

schedule11 Mar 26 person by visibility 270 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : छत्रपती संभाजी नगर येथे ५-८ मार्च २६ रोजी संपन्न झालेल्या सृजन,कौशल्य विभाग मंत्रालय,महाराष्ट्र राज्य व एम.आय.टी.कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय डिपेक्स-२६ या प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वागत) महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी वेस्ट मॅनेजमेंट या विभागात सर्वोत्कृष्ट प्रोजेक्टचा बहुमान मिळवला.राज्यभरातून आलेल्या जवळपास ७० महाविद्यालयांशी स्पर्धा करत हा बहुमान केआयटी ने पटकावला आहे.

‘वॉल माऊंटेड वेस्ट श्रेडिंग मशीन’ या प्रोजेक्टच्या माध्यमातून घरामध्ये दररोज निर्माण होणाऱ्या किचन वेस्ट साठी एक छोटे व सहज वापरण्यायोग्य मशीन बनवलेले आहे.ज्यातून एखाद्या अपार्टमेंटमध्ये निर्माण होणारे किचन वेस्ट सुद्धा अगदी थोड्या वेळात कंपोस्ट बेड साठी इनपुट मटेरियल म्हणून वापरले जाऊ शकते. शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील तज्ञ परीक्षकांकडून याचे मूल्यांकन केले गेले. या प्रोजेक्ट टीम मध्ये सुयश तुपे, सोहम बिरंजे,स्वानंद शिंदे आणि सायली कांबळे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.प्रा.अमित वैद्य यांनी या प्रोजेक्टचे मार्गदर्शक म्हणून काम केले. विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरातून आलेल्या अनेक इंक्युबेटर्स, स्टार्टअप प्रमोटर यांनी या प्रोजेक्ट व्यावसायिक दृष्टीकोनातून सर्व प्रकारचे आर्थिक,तांत्रिक सहकार्य करण्याची तयारी दाखवलेली आहे.

अशा स्पर्धेत पारितोषिके जिंकणे हे केआयटीमध्ये विकसित झालेल्या दृष्टी आणि संस्कृतीप्रती विद्यार्थ्यांच्या समर्पणाचे दर्शन घडवते. फक्त स्पर्धेमध्ये सहभाग घेणेया पुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थी आता त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून उद्योजकीय प्रेरणा घेऊन स्टार्टअप चा विचार करू लागलेले आहेत अशा भावना संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केल्या.विभागाचे विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर, संस्थेचे अध्यक्ष  साजिद हुदली, उपाध्यक्ष  सचिन मेनन, सचिव श्री दीपक चौगुले यांचे मोलाचे प्रोत्साहन यासाठी मिळाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes