'गोकुळ' निवडणुकीत विश्वासाचा घात; महायुतीचे नेते स्वतःच्याच कार्यकर्त्यांवर अविश्वासी : आ. सतेज पाटील यांचा घणाघात
schedule16 Oct 26 person by visibility 364 categoryराजकीय
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची मतदान तारीख जवळ आली असताना, महायुतीकडून सुरू असलेल्या राजकारणावर आमदार सतेज पाटील यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आणि कर्नाटकात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा असतानाही, दुर्दैवाने महायुतीकडून अंधविश्वासाचे राजकारण केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
४ हजार मतदार असताना शपथ घेण्याची वेळ का येते? याचा अर्थ स्पष्ट आहे की महायुतीच्या नेत्यांचा त्यांच्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की महायुतीतले मंत्री आणि आमदारच असे राजकारण करत आहेत.
चेअरमनपदी शशिकांत चुयेकर यांचे नाव जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर टीका होत असल्या, बाबत बोलताना आ. सतेज पाटील म्हणाले की, "एक वर्षापूर्वीच शशिकांत चुयेकर यांचे नाव चेअरमन पदासाठी महायुतीने रोखून धरले होते. महायुतीनेच त्या ठिकाणी चेअरमनपद हिसकावून घेतले, म्हणूनच आम्ही आता त्यांचे नाव जाहीर केले आहे. आमचे पॅनेल जिंकून आल्यानंतर चुयेकर हेच पहिले चेअरमन होतील. आनंदराव चुयेकर यांचे गोकुळसाठी मोठे योगदान आहे, म्हणूनच त्यांचा पुतळा गोकुळमध्ये उभा आहे."
ज्याप्रमाणे सरदार पटेल फेडरेशन'कडे गोकुळ ताब्यात देऊन गोकुळचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे, तसाच आनंदराव चुयेकर यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न दिसत आहे, असा आरोप आ. पाटील यांनी केला. विरोधकांच्या या कृतीमागे गोकुळची मालकी कोल्हापूरबाहेर नेण्याचा 'मल्टीस्टेट'चा धोका दडलेला असून, हा धोका केवळ आमचे पॅनेलच थांबवू शकते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
.