SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.3 राजारामपुरी व केंद्र क्रं.4 पंचगंगा या आरोग्य संस्था गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय मानांकनास पात्रकोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘फ्युचर रेडी इंजिनिअर ’ कार्यक्रमाचा समारोप'गोकुळ' निवडणुकीत विश्वासाचा घात; महायुतीचे नेते स्वतःच्याच कार्यकर्त्यांवर अविश्वासी : आ. सतेज पाटील यांचा घणाघातपुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कौस्तुभ गावडे यांची सोलापूरमध्ये दमदार मोर्चेबांधणी!महायुतीची वज्रमूठ पक्की! कोल्हापुरात प्रचाराचा बिगुल वाजला, विजयाचा दावा ठामसंकलित मूल्यमापन चाचणी (PAT-2) - गुणवत्ता वाढीचा मूलाधार : डॉ. अजितकुमार पाटीलमोरेवाडी येथे स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र कार्यान्वित; योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहनमहाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळातर्फे नागाळा पार्कमध्ये १९ ऑक्टोबरला भव्य दांडिया सोहळा!पवित्र पोर्टलद्वारे नियमित शिक्षक भरतीसाठी कटिबद्ध; रिक्त पदांची १०० टक्के भरती करण्यासाठी पाठपुरावा करणार : कौस्तुभ गावडेजागतिक अन्न दिन: अन्नाची नासाडी रोखण्याची आणि भूकमुक्तीची प्रतिज्ञा

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘फ्युचर रेडी इंजिनिअर ’ कार्यक्रमाचा समारोप

schedule16 Oct 26 person by visibility 343 categoryशैक्षणिक

वारणानगर : कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांना उद्योगक्षेत्राच्या भविष्यातील गरजांसाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्युचर रेडी इंजिनिअर ’ या कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.  पाच दिवस चाललेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.

या समारोप समारंभासाठी मुंबई येथील रिलायन्स इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. कृष्णकांत ठाकरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगक्षेत्रातील बदल, तांत्रिक कौशल्यांचे महत्त्व आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी यांविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्ये, नवकल्पना, संवादकौशल्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करावी, असे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख ‘फ्युचर रेडी इंजिनिअर ’ कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. यू. बी. देशन्नावर यांनी करून दिली. त्यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले.

रासायनिक अभियांत्रिकी विभागाची माहिती विभागप्रमुख डॉ. पी. बी. देहणकर यांनी दिली. त्यांनी विभागातील शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या संधी आणि उद्योगाभिमुख शिक्षणाचे महत्त्व यांविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे अध्यक्ष, डॉ. विनयरावजी कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील, कुलगुरू, डॉ. डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, प्राचार्य डॉ. के. आय. पाटील आणि अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे , सेंट्रल फ्युचर रेडी इंजिनिअर समन्वयक डॉ. ए.व्ही.पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच, हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. जे. पाटील यांचे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण, आधुनिक तांत्रिक कौशल्ये आणि रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी त्यांनी  योगदान दिले. 

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ‘फ्युचर रेडी इंजिनिअर ’ कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. व्ही. ए. भोसले यांनी केले. त्यांनी प्रमुख पाहुणे, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, प्राध्यापकवृंद, आयोजक आणि कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes