SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार गुणस्वराज्य भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणकळंबा ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते ध्वजपूजन, तर प्रकाश खडके यांच्या हस्ते ध्वजारोहणमहाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेत ध्वजारोहण उत्साहात कामगार दिन : श्रमिकांच्या घामाचा आणि संघर्षाचा सन्मानमहाराष्ट्र दिन : मराठी अस्मितेचा सुवर्ण सोहळास्वच्छता मोहिमेत 25 टण प्लास्टिक, तणकट व खरमाती उठावटाकाळा येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून पाहणीराष्ट्रीय साखर तंत्रज्ञ असोसिएशनच्या कौन्सिल सदस्यपदी मनोहर जोशी यांची बिनविरोध निवडडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी पणजी गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन

जाहिरात

 

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा; अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण; श्री. महादेव दूध संस्थेची याचिका फेटाळली

schedule30 Apr 26 person by visibility 436 categoryउद्योग

 कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या निर्णयामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे, असे स्पष्टीकरण दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. दरम्यान; श्री. महादेव सहकारी दूध संस्थेच्यावतीने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. 
           
या पत्रकात  मुश्रीफ यांनी पुढे म्हंटले आहे, अंतरीम अवसायानातील १,१०८ दूध संस्थांपैकी काही दूध संस्थांच्या सुनावण्या पूर्ण होऊन त्यांचे निकालही दिलेले आहेत. अंतरीम अवसायानातील उर्वरित दूध संस्थांच्या  सुनावणीची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या शपथपत्राच्या अनुषंगाने ७० ते ७५ दिवसात पूर्ण करून तात्काळ निवडणूक कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले आहेत. 
      
या पत्रकात  मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या १,१०८  संस्थांनी दूध संघाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी म्हणून याचिका दाखल केली होती. आज त्याची सुनावणी होऊन मा. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. या आदेशात पुढे म्हटले आहे की, या १,१०८ दूध संस्थांचा मतदानाचा हक्क डावलू नये म्हणून नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार त्यांना संधी देण्यात यावी. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर कायद्यातील तरतूदीनुसार निवडणूक कार्यक्रम चालू करण्यात यावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes