SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

एमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजन

schedule16 Jun 26 person by visibility 53 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) ही महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था असून, राज्यात उद्योजकतेला चालना देणे, उद्योजकतेविषयी पोषक वातावरण निर्माण करणे तसेच उद्योजकीय ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करत असते. याच उद्देशाने एम.सी.ई.डी. जिल्हा कार्यालयामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, महिला तसेच नवउद्योजकांसाठी दोन आठवड्यांच्या ‘उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे’ आयोजन 22 जून ते 4 जुलै या कालावधीत कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, विविध उद्योग संधींची ओळख, उद्योग संधीचा शोध व निवड, उद्योग सुरू करण्याची पूर्वतयारी, उद्योग उभारणीचे विविध टप्पे, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ पाहणी तंत्र, प्रत्यक्ष पाहणी व अहवाल लेखन, विपणन व्यवस्थापन व विक्री कौशल्य, लघुउद्योग विषयक कायदे, शासकीय धोरणे, हिशोब लेखन, लघुउद्योग व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योगासाठी आवश्यक परवाने व नोंदणी प्रक्रिया तसेच विविध कर्ज योजनांची माहिती याबाबत तज्ज्ञ व अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच CMEGP आणि PMEGP योजनेंतर्गत ऑनलाईन कर्ज प्रस्ताव दाखल करण्याबाबतही सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सशुल्क असून प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सहभागी उमेदवारांना एमसीईडीकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांनी प्रवेश व अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयक विशाखा भास्कर (मो. 7264070764), वंदना घाटगे (मो.9552747629) किंवा प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई.डी. जिल्हा कार्यालय, उद्योग भवन, महावीर गार्डन समोर, जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी, कोल्हापूर येथे 22 जून पूर्वी संपर्क साधावा, असे आवाहन एम.सी.ई.डी. मार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes