द्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव
schedule16 Jun 26 person by visibility 125 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त न्यू द्वारकानाथ कपूर विद्यालय, गंजीमाळ येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना नवीन शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंडा लोंढे प्रमुख उपस्थित होते.
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे मनोबल उंचावले. तसेच सभापती सत्यजित जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश आणि विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.
यावेळी मुख्याध्यापिका मिनाक्षी चौगले, सहशिक्षिका स्नेहलता बरगे, सहशिक्षक चंद्रकांत पाटील, सेवक शिवाजी पाटील यांच्यासह पालक, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला. शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.