दुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिल
schedule16 Jun 26 person by visibility 112 categoryराज्य
कोल्हापूर : इरिगेशन फेडरेशन व लाभधारक शेतकरी यांच्या सोबत दिनांक 15 जून रोजी झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार इरिगेशन फेडरेशन व लाभधारक शेतकरी यांनी दूधगंगा धरण वगळता इतर सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने शेतीकरिता एक सिंचन आवर्तन देण्याची मागणी केली असल्याने दूधगंगा नदी वगळता सर्व नद्यावरील उपसाबंदी 17 ते 19 जून पर्यंत शिथिल करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभागाने (उत्तर) प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.
दिनांक 20 जून रोजी धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. धरणांतील व प्रकल्पातील मर्यादित पाणीसाठ्याचा विचार करुन बिगर सिंचन पाणी वापरकर्त्यांकडून सांडपाणी/औद्योगिक वापरातील पाणी,थेट नदीत सोडून पाणीसाठा दूषित करु नये.
प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सर्व संबंधितांनी याची दक्षता घेऊन पाणीनाश टाळावा, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.